NEET Paper Leak : पुण्यातील प्रसिद्ध कॉलेजच्या प्राचार्याला बेड्या! 'नीट' च्या परीक्षेत असा झाला पेपरचा सौदा

NEET Paper Leak 2026 : देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावणाऱ्या नीट-यूजी 2026 पेपर लीक प्रकरणात सीबीआयने  मोठी कारवाई केली आहे

जाहिरात
Read Time: 2 mins
NEET Paper Leak : पुण्यातील एका प्रसिद्ध महाविद्यालयाच्या प्राचार्यांनाच  बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
मुंबई:

NEET Paper Leak 2026 : देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावणाऱ्या नीट-यूजी 2026 पेपर लीक प्रकरणात सीबीआयने  मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात पुण्यातील एका प्रसिद्ध महाविद्यालयाच्या प्राचार्यांनाच  बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ज्यांच्यावर प्रश्नपत्रिका काढण्याची आणि गोपनीयतेची जबाबदारी होती, त्यांनीच पेपर फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

कुणाला झाली अटक?

नीट परीक्षेतील भौतिकशास्त्र (फिजिक्स) विषयाचे प्रश्न लीक केल्याच्या आरोपाखाली सीबीआयने मनिषा संजय हवालदार यांना पुण्यातून अटक केली आहे. मनिषा हवालदार या पुणे येथील विद्या प्रसारणी सभेच्या सेठ हिरालाल सराफ प्रशालेत आणि महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. 

Advertisement

मनिषा 1992 पासून या संस्थेत फिजिक्स विषयाच्या अध्यापनाचे काम करत होत्या आणि 2024 मध्ये त्यांची प्राचार्या म्हणून नियुक्ती झाली होती. विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांनी म्हणजेच 30 जून 2026 मनिषा सेवानिवृत्त होणार होत्या, मात्र त्याआधीच त्या सीबीआयच्या जाळ्यात अडकल्या आहेत.

( नक्की वाचा : NEET Paper Leak : परीक्षेआधीच वाटला पेपर; लातूरचा प्राध्यापक PV कुलकर्णीने असा रचला होता पेपरफुटीचा प्लॅन )

तज्ज्ञ म्हणून नियुक्ती आणि विश्वासाला तडा

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) मनिषा हवालदार यांची फिजिक्स विषयाच्या तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती. पेपर सेटिंग प्रक्रियेत त्या फिजिक्स विषयाच्या प्रमुख म्हणून काम करत होत्या, त्यामुळे त्यांना प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची संपूर्ण माहिती उपलब्ध होती. मात्र, या पदाचा आणि गोपनीयतेचा गैरवापर करत त्यांनी एप्रिल 2026 दरम्यान परीक्षेतील काही प्रश्न सहआरोपी मनिषा मंधारे हिच्यासोबत शेअर केले. मनिषा मंधारेला सीबीआयने 16 मे 2026 रोजी आधीच अटक केली आहे. हवालदार यांनी दिलेले प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांशी जुळले असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.


( नक्की वाचा : NEET Paper Leak: बापानं लाखो खर्चून पेपर चोरला, पण पोरगा अभ्यासात ढ! नीट परीक्षेतील सर्वात मोठी 'कॉमेडी' उघड )

देशभरात सीबीआयचा धडाका

या घोटाळ्याचा छडा लावण्यासाठी सीबीआयने दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर अशा विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकूण 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपास यंत्रणेने आरोपींच्या ठिकाणाहून लॅपटॉप, मोबाईल फोन, बँक स्टेटमेंट्स आणि महत्त्वाची गुन्हेगारी कागदपत्रे जप्त केली आहेत. तपासातून असेही समोर आले आहे की, नीट परीक्षेत येणारे प्रश्न काही विशेष कोचिंग क्लासेसमध्ये दिले जात होते आणि त्यासाठी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळले जात होते.

आता मनिषा हवालदारच्या अटकेनंतर पेपर फुटीचा मुख्य स्रोत समोर आला असून, यामध्ये आणखी कोणते मोठे मासे अडकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सीबीआयची विशेष पथके सध्या जप्त केलेल्या तांत्रिक पुराव्यांचे सखोल विश्लेषण करत असून, या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या मध्यस्थांचीही ओळख पटवण्यात आली आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article