Nagpur News: 6500 कोटी खर्च करून नवीन नागपूर उभारले जाणार, नव्या शहरात असणार 'या' गोष्टी

नागपूर शहराजवळ हिंगणा तालुक्यात नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला लागूनच न्यू नागपूर सिटी आकार घेणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नागपूर:

मुंबई शहर वाढत गेल्यानंतर त्याला पर्याय म्हणून नवी मुंबई हे शहर वसवण्यात आलं आहे. त्याच धर्तीवर आता नागपूर जवळच नवीन नागपूर वसवलं जाणार आहे. नवीन नागपूर सिटी हा 6500 कोटींचा प्रकल्प असून तो 692 हेक्टर जागेवर  असणार आहे. मंजूर खर्चापैकी सुमारे 3 हजार कोटी रुपये भूमी अधिग्रहण करिता राखीव ठेवण्यात आले आहेत. नवीन शहर वसवण्यासाठी नागपूर मेट्रो रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी अर्थात NMRDA, तसेच हुडको आणि NBCC यांच्यात याबाबतचा करार झाला आहे.

नवीन नागपूर विकसित करण्यासाठी NMRDA आणि हुडको, NBCC यांच्यात करार झाला आहे. नवीन नागपूरसाठी NBCC प्रकल्प व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून काम करणार आहे. नवीन नागपूर  1710 एकरवर विकसित होणार आहे. त्याच जोडीला 148 किमीचा नागपूर आऊटर रिंगरोड उभारला जाणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी 11,300 कोटी रुपये हुडको देणार आहे. यातील 6500 कोटी नवीन नागपूरसाठी असतील.  तर 4800 कोटी आऊटर रिंगरोडसाठी वापरले जातील. नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत हा विकास होणार आहे. 

नक्की वाचा - Nagpur Traffic Changes : नागपूर शहरात जड वाहनांना प्रवेश बंदी, वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी

या नवीन नागपूर येथे IBFC सेंटर राहणार आहे. शिवाय उद्योग, स्टार्ट अप्स आणि कॉर्पोरेट ऑफिसेस असतील. शिवाय 692 हेक्टर क्षेत्रावर नवीन प्रगत सरकारी टाऊनशिप असेल. प्रकल्प जिथे होणार आहे त्या लाडगाव आणि गोधणी रीठी या गावांमध्ये प्रती एकर 2 ते अडीच कोटी रुपयांपेक्षा कितीतरी पुढे दर गेला आहे. आजूबाजूच्या गावांमध्येही दरवाढ जाणवत आहे. यामध्ये गुमगाव, वडगाव, मेंनखाट, देवळी, सावांगी आणि इतर गावांचा समावेश हा नव्या नागपूरमध्ये असणार आहे. त्यामुळे जमिन अधिग्रहणा आधीच या ठिकाणच्या जमिनीचे भाव गगनाला भिडलेले दिसत आहेत. 

नक्की वाचा - Kalyan News: रामदेव हॉटेलमध्ये पुन्हा निष्काळजीपणाचा कळस, फ्राईड राईसमध्ये आता आढळले...

नागपूर शहराजवळ हिंगणा तालुक्यात नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला लागूनच न्यू नागपूर सिटी आकार घेणार आहे. हे नवीन नागपूर शहर एक हाय टेक बिझनेस हब आणि एक  Futuristic city उभारण्यात येणार आहे. या संदर्भात सोमवारी 8 सप्टेंबर रोजी नागपूर मेट्रो रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी अर्थात NMRDA, तसेच हुडको आणि NBCC यांच्यात करार झाला आहे.  केंद्र सरकारचे उद्यम असलेले NBCC India Ltd यांनी हा प्रकल्प विकसित करण्यासाठी प्रकल्प सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, आता या प्रकल्पाची घोषणा झाल्यानंतर येथील जमिनीला विदर्भातील सर्वाधिक दराची मागणी होत आहे. प्रती एकर अडीच ते पाच कोटी रुपयांची मागणी येथील शेतकरी करत आहेत. लाडगाव आणि गोधनी रीथी या गावात हा प्रकल्प होणार असला तरी आजुबाजूच्या गावांचे देखील दर कितीतरी पटीनी वाढले आहेत. 

Advertisement