जाहिरात

Nagpur Traffic Changes : नागपूर शहरात जड वाहनांना प्रवेश बंदी, वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी

Nagpur News : नागपुर शहरातील वाहतूक कोंडी, अपघातांची संख्या आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी शहरात जड वाहनांच्या हालचालींवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Nagpur Traffic Changes : नागपूर शहरात जड वाहनांना प्रवेश बंदी, वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी
वाहतूक पोलिसांनी शहरात जड वाहनांच्या हालचालींवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे

Nagpur Traffic Rules : नागपुर शहरातील वाहतूक कोंडी, अपघातांची संख्या आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी शहरात जड वाहनांच्या हालचालींवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून यानुसार सकाळी 9 ते रात्री 10 या कालावधीत जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी असणार आहे. एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणाऱ्या ट्रकला आउटर रिंगरोडचाच (Nagpur Traffic Changes) वापर करावा लागणार आहे. 8 सप्टेंबरपासून ही नियमावली महिन्याभरासाठी लागू असेल.

Toll Fastag Annual Pass: फास्टटॅगचा वार्षिक पास देशभर लागू! काय होणार फायदा? वाचा सर्व प्रश्नांची उत्तरं

नक्की वाचा - Toll Fastag Annual Pass: फास्टटॅगचा वार्षिक पास देशभर लागू! काय होणार फायदा? वाचा सर्व प्रश्नांची उत्तरं

वाहतूक पोलिसांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार मोठे ट्रक, ट्रेलर, डंपर, कंटेनर आदी वाहनांना शहराच्या मुख्य रस्त्यांवर रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेतच प्रवेश करता येईल. याव्यतिरिक्त त्यांना प्रवेश करता येणार नाही. मात्र तरीही वाहतूक पोलिसांच्या नियमांची पायमल्ली केली तर 10 हजारांचा दंड ठोठवण्यात येईल असंही सांगण्यात येत आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com