![Tur Price : तुरीचे दर घसरले, मात्र आवकही घटली; सध्याचे दर किती? Tur Price : तुरीचे दर घसरले, मात्र आवकही घटली; सध्याचे दर किती?](https://c.ndtvimg.com/2024-12/gq1oah48_tur_625x300_22_December_24.jpg?im=FitAndFill,algorithm=dnn,width=773,height=435)
सर्वसामान्यांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांच्याच स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजे डाळी. त्यातही तुरीच्या डाळीचा वापर सर्वाधिक असतो.
गेल्या आठ दिवसात तुरीच्या कमाल भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. बाजारात दाखल झालेल्या नव्या तुरीच्या दरात थेट 1660 रुपयांनी घसरण झाली आहे. गेल्या आठ दिवसात तुरीचे दर घसरले आहेत. अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या तुरीला 8085 रुपये इतका कमाल भाव मिळतोय. तर सरासरी भाव हा 8 हजार रुपयांच्या जवळपास आहे. मागील आठ दिवसात नव्या तुरीच्या दरात 1600 रुपयांची घसरण झाल्याने आवकही घटली आहे.
नक्की वाचा - Dog Attack: भयंकर! भटक्या कुत्र्याचा हैदोस, 35 जणांचे लचके तोडले; नागरिक भयभीत
त्यामुळे या हंगामात देखील शेतकरी भाववाढीच्या प्रतीक्षेत तूर घरात साठवून ठेवण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये तुरीची आवक वाढण्याची शक्यता कृषी बाजार समितीने व्यक्त केली आहे. सध्या तुरीला सरासरी भाव 7900 रुपये प्रति क्विंटल मिळतो आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तुरीच्या भावातील या आठवड्यात झालेले चढ-उतार
तारीख किमान कमाल
12 डिसेंबर 7900 9745
13 डिसेंबर 7900 9800
14 डिसेंबर 7500 9600
17 डिसेंबर 6000 8000
18 डिसेंबर 7000 7875
19 डिसेंबर 7000 8670
20 डिसेंबर 7000 8205
21 डिसेंबर 6400 8505
दरम्यान किरकोळ बाजारात महागाईचा भडका उडाला असून डाळींपाठोपाठ कडधान्यही महागलं आहे. दिवाळी संपल्यानंतरही महागाईचा भडका कायम आहे. डाळींच्या दरात किलोमागे 5 ते 10 रुपयांची वाढ आणि कडधान्यांमध्येगी 5 ते 10 रुपयांची वाढ झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world