आज सर्वत्र नववर्षाचं सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. राज्यभरातील पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. रात्रीही मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांपासून मंदिरांमध्येही मोठी गर्दी पाहायला मिळेल. त्यातही नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी नववर्षाच्या स्वागतासाठी बेस्टच्या अतिरिक्त बस सोडण्यात येणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नवर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, जुहू, गोराई, मार्वेसह मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवरील पर्यटकांसाठी बेस्ट उपक्रमांतर्फे विविध बसमार्गांवर रात्री 25 अतिरिक्त बस सोडण्यात येणार आहे. गरज लागल्यास बसची संख्याही वाढवण्यात येईल. बेस्टकडून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, जुहू चौपाटी, गोराई समुद्रकिनारा, चर्चगेट स्थानक (पूर्व) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी वाहतूक अधिकारी आणि बस निरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
नक्की वाचा - ISRO ची नवी गगनभरारी, भारताच्या मानवी चांद्रमोहिमेतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (म्युझियम) - गेट वे ऑफ इंडिया - मंत्रालय - एनसीपीए - नरिमन पॉईंट - विल्सन महाविद्यालय - नटराज हॉटेल - चर्चगेट - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हुतात्मा चौक - रिझर्व्ह बँक - ओल्ड कस्टम हाऊस - म्युझियम या मार्गांवरील सकाळी 10 ते पहाटे 3 वाजेपर्यंत दर 45 मिनिटांनी विशेष बसगाड्या सोडण्यात येणार आहे.
हेरिटेज टूर चालविण्यात येणार...
बेस्टच्या वातानुकूलित दुमजली बसद्वारे हेरिटेज टूर चालविण्यात येणार आहे. वरच्या मजल्यासाठी प्रत्येकी 150 रुपे तर खालच्या मजल्यासाठी प्रत्येक 75 रुपये भाडे आकारण्यात येतील.
थर्टी फस्टसाठी १५ हजार पोलिसांचा फौजफाटा..
नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत १५ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याशिवाय ड्रंक अँड ड्राइव्हकडेही पोलिसांचं विशेष लक्ष असेल. याशिवाय पोलिसांचे पथक शहरातील ड्रग्ज विक्रेते, हॉटेल्स-पब्ज, नाइट क्लब आणि रिसॉर्टवरील पार्ट्यांकडे लक्ष असेल.