राज्यात सध्या बीडच्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे प्रकरण गाजत आहे. एकीकडे पोलीस आणि सीआयडीने या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी बीडमध्ये तळ ठोकला असतानाच राजकीय वातावरणही तापत आहे. अशातच सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या प्रकरणात सर्व बाजूनी दबाब वाढल्यानं अखेर सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीची माफी मागितली आहे.
Live Uupdate : ISRO ची नवी गगनभरारी, भारताच्या मानवी चांद्रमोहिमेतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. 2024 या वर्षाच्या अगदी शेवटी इस्रोने स्पेस डॉकींगचा प्रयोग केला. PSLV C 60 या यानाचा वापर करुन इस्रोच्या शास्त्रज्ञांनी एक यान अंतराळात पार्क करण्याच्या उद्देशानं लॉन्च केलंय. पृथ्वीपासून अगदी शेवटच्या कक्षेत एखादं यान पाठवण्याच्या प्रक्रियेला डॉकिंग असं म्हणतात.. आज जगभरात
अगदी मोजक्या देशांकडे हे तंत्रज्ञान आहे. या प्रयोगाच्या सगळ्या प्रक्रिया आता पूर्ण झाल्या आहेत. भारताच्या मानवी चांद्रमोहिमेतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
Live Update : रेल्वे रुळावर सिलिंडर ठेवून घातपाताचा प्रयत्न, पुण्यातील उरळी कांचन भागातील घटना
उरूळी कांचन येथे रेल्वे रुग्णावर सिलिंडर ठेवून घातपाताचा प्रयत्न करण्यात आला होता. काल 29 डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचं गांभीर्य ओळखून वरिष्ठांनी घटनास्थळाला भेट दिली. याप्रकरणी रेल्वेचे लोको पायलट शरद शहाजी वाळके, (वय 38 ) यांनी फिर्याद दिली आहे.
Live Update : गोव्यातून दारू आणताय सावधान! मुंबई-गोवा महामार्गावर एक्साईज विभागाचे तपासणी नाके
नवीन वर्ष सेलिब्रेशनच्या अनुषंगाने रत्नागिरीचं राज्य उत्पादन शुल्क विभाग अलर्ट मोडवर आलं आहे. गोवा बनावटीची अवैध दारू तस्करी रोखण्यासाठी एक्साईज विभागाचे विशेष प्रयत्न महामार्गावर सुरू आहेत. मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तपासणी नाके आहेत. गोव्याकडून येणाऱ्या दारूच्या साठ्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून ठिकठिकाणी वाहनांची कसून तपासणी केली जातेय
Live Update : पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या गोळीबारात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू
वसमत शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस शिपायाने घरगुती वादातून हिंगोली शहरातील प्रगती नगर भागातील सासुरवाडी मध्ये जाऊन गोळ्या झाडून पत्नीला ठार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. यामध्ये सासू, मेव्हणा आणि पोटच्या दोन वर्षाच्या मुलावर देखील आरोपीने गोळ्या झाडल्या होत्या. या तिघांवरही नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना मेव्हणा योगेश धनवे यांचा काल मृत्यू झाला होता. तर सासू वंदना धनवे यांचा आज मृत्यू झाला आहे आणि दोन वर्षीय चिमुकल्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. या गोळीबाराच्या घटनेत आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे..
Live Update : वेळेवर उपचार न मिळाल्यानं नवजात बाळाचा मृत्यू, मुंबईच्या जवळच घडली धक्कादायक घटना
पालघर जिल्ह्यातल्या मोखाड्यात आशा भुसारे या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना तादी आहे. त्याचवेळी मोखाडा तालुक्यातील कुर्लोद गावातील नवजात बाळाच्या मृत्यूची घटना घडली आहे.गरोदर महिला संगीता दोंदे यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात फक्त शिकाऊ डॉक्टर आणि नर्स होती.
त्यांनी या महिलेला प्रथम ग्रामीण रुग्णालयात पाठवले. तिथंही प्रशिक्षित डॉक्टर नव्हते. त्यामुळे नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला. मोखाड्याहून नाशिकमध्ये जाताना वाटेतच संगीता यांची प्रसुती झाली. त्यानंतर बाळाची तब्येत बिघडली. त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. वेळेवर उपचार आणि प्रसुती झाली असती तर बाळा देखील सुखरुप असते, असा दावा बाळाची आई संगीता दोंदे यांनी केला आहे.
Live Update : संतोष देशमुखांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा होता प्लान? एका महिलेला अटक करणार, कराडचही कनेक्शन समोर
महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या खंडणी प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड याच्याशी संबंधित असलेल्या आणखी एका महिलेला अटक केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती.
अटक करण्यात येणारी महिला धाराशिव जिल्यातील वाल्मिक कराड यांच्याशी निकटवर्तीय असल्याचा संशय
धाराशिव जिल्यातील कळंब शहरातील महिलेकडून संतोष देशमुख यांना विनयभंग प्रकरणी अडकवण्याचा होता प्रयत्न
सुरेश धस याबाबत आरोप करीत महिलेच्या अटकेची मागणी केली होती
या अगोदरही या महिलेला खोट्या विनयभंगाच्या तक्रारीसाठी वापर केल्याचा आरोप
या महिलेला अटक केल्यास एकूण या प्रकरणात दोन महिला संबंध उघड होणार असल्याची माहिती
NDTV मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती
Live Update : उल्हासनगरात प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हाध्यक्षावर खंडणीचा गुन्हा दाखल
उल्हासनगरात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील, राष्ट्र कल्याण पार्टीचे शैलेश तिवारी यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. बांधकाम व्यावसायिक राजा गेमनानी यांच्याकडे दूत पाठवून पाच लाख रुपये खंडणी घेतल्याचा त्यांच्यावर आरोप असून गेमनानी यांनी पैसे देतानाचं सीसीटीव्ही फुटेजच उघड केलं आहे. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
Live Update : संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख बीड शहर पोलीस ठाण्यात दाखल
माजी सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख बीड शहर पोलीस ठाण्यात दाखल
CID ला माहिती देण्यासाठी बीड शहर पोलीस ठाण्यात दाखल
मागील चार दिवसांपासून या प्रकरणात सीआयडी पथकाकडून चौकशी सुरू आहे.
चौकशीचा भाग म्हणून धनंजय देशमुख यांना सीआयडीमार्फत चौकशी सुरू आहे.
Suresh Dhas: संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा रोख बदलू नका: सुरेश धस
बीडचे भाजीपाल्यासारखे परवाने दिले जात असतील, तर महाराष्ट्राचा बिहार नाही तर काबुलिस्तान होण्याची वेळ आली आहे. कोणीही परवाने काढतोय, लक्ष्मीपूजनाला ठॉय करतोय, कोणी चौकात उभा राहिला की ठॉय करतोय, कोणी धाब्यावर बसलाय तो पण ठॉय करतोय. हे ठॉय-ठॉय जिल्हाधिकाऱ्यांनी संपवावे, असं म्हणत भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख प्रकरणावरुन संताप व्यक्त केला आहे.
Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुख हत्या प्रकरण: हायकोर्टात रीट याचिका दाखल
बीडच्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी औरंगाबाद हाय कोर्टात क्रिमिनल रिट याचिका दाखल दाखल केली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी, अशी मागणी या याचिकेतून केली आहे.
Jayant Patil: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील रत्नागिरी दौऱ्यावर
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दिवंगत कुमार शेट्ये यांच्या घरी त्यांनी भेट दिली. काही दिवसांपूर्वी कुमार शेट्ये यांच्या निधनानंतर शरद पवार यांनीही पत्र लिहून शेट्ये कुटुंबाचं सांत्वन केलं होते.
Maharashtra Politics: अजित पवारांचा आमदार शरद पवारांच्या भेटीला; पुण्यात मोठी घडामो़ड
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे शरद पवारांच्या भेटीसाठी मोदी बागेत गेले आहेत. हडपसरचे आमदार चेतन तुपे पाटील हे शरद पवारांची मोदी बाग या कार्यालयात भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत असून या भेटीचे कारण अद्याप समोर आलेलं नाही.
Ravindra Waykar Accident: मोठी बातमी: शिवसेनेचे खासदार रविंद्र वायकर यांच्या गाडीला अपघात
शिवसेना शिंदे गटाचे खासदार रविंद्र वायकर यांच्या गाडीला मध्यरात्री अपघात झाल्याची घटना घडली. जोगेश्वरीच्या एस आर पी एफ कॅम्पच्या गेटजवळ हा अपघात झाला. रविंद्र वायकर यांच्या गाडीला धडक दिलेल्या गाडीचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचं सांगण्यात येत आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर पोलीसही अपघातस्थळी दाखल झाले असून यामध्ये कोणीही गंभीर जखमी झाले नसल्याची माहिती समोर आली आहे.
Kalyan Crime: कल्याण अत्याचार हत्या प्रकरण: आरोपी विशाल गवळीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले
कल्याण पूर्व अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार हत्या प्रकरण
आरोपी नराधम विशाल गवळी याला पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले
रुटीन वैद्यकीय तपासणी असल्याची पोलिसांची माहिती
सुरक्षिततेच्या कारणास्तव विशाल गवळी याला रात्री वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेले
tarapur MIDC Fire: तारापूर एमआयडीसी मधील आग नियंत्रणात
तारापुर MIDC मधील यु के एरोमँटिक अँड केमिकल कंपनीला रविवारी संध्याकाळी साडे पाच वाजता भीषण आग लागली होती. या आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, बाजूच्या आदर्श टेक्स्टाईल आणि श्री केमिकल्स या कंपन्यांही आगीच्या विळख्यात सापडल्या. सुरुवातीला तारापूर एमआयडीसी मधील तीन गाड्याच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न सुरू होता मात्र आगीची भीषणता वाढत असल्याचे पाहून NDRF चे पथक त्याच सोबत डहाणू अदानी पावर लिमिटेड, भाभा अणूशक्ती केंद्र, पालघर नगरपरिषद , वसई विरार महापालिका अग्निशमन दल अशा संपूर्ण पालघर जिल्ह्यातील 12 अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी दिली.
रात्री बारा वाजण्याच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले असून पहाटेपर्यंत कुलिंगचे काम तसेच सर्चींग ऑपरेशन सुरू आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच सर्च ऑपरेशन पूर्ण झाल्यावरच जीवित हानी बद्दलची माहिती तसेच आगीच नेमकं कारण समोर येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
Maharashtra Farmer: हवामान बदलाचा शेतकऱ्यांना जोरात फटका, मिरचीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव
मिरचीवर करपा जाणवू लागल्याने पुन्हा एकदा तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. यंदा सततच्या संकटांतून सावरण्यास निसर्गाने शेतकऱ्यांना वेळच दिलेला नाही. यंदाच्या मोसमात चांगला पाऊस झाला पण महावितरणच्या गलथान कारभारामुळे लाईट व्यवस्थित नसल्यामुळे इतर पिकांसाठी हे नुकसानकारक ठरत आहे. महागडे बियाणे, रासायनिक खते, वाढती मजुरी अशा स्थितीत शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली अन् आता दुष्काळात तेरावा महिना अशी गत निर्माण झाली आहे. मिरचीची रोपेही करपू लागली आहेत. यामुळे शेतकरी वर्ग पूर्णत: धास्तावला आहे.