Nashik News : नाशिकमध्ये हळहळ! नवविवाहित दाम्पत्याच्या संसाराचा झाला भयानक शेवट, शिक्षिकेसह पतीचा मृत्यू

नाशिकच्या कळवण तालुक्यातील पिळकोस फाट्यावर आज एक दुर्देवी घटना घडली. मॅक्स गाडी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात नवविवाहित दाम्पत्याचा मृत्यू झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Newly Married Couple Died In Nashik

नीलेश वाघ, प्रतिनिधी 

Nashik Accident News Today :  नाशिकच्या कळवण तालुक्यातील पिळकोस फाट्यावर आज एक दुर्देवी घटना घडली. मॅक्स गाडी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात नवविवाहित दाम्पत्याचा मृत्यू झाला. दिनेश गावित आणि किर्ती गावित अशी मृत पावलेल्या पती-पत्नीचं नाव आहे. ही घटना आज सकाळी सव्वा आठ वाजताच्या सुमारास घडली.अपघाताच्या घटनेमुळं गावित कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. कीर्ती गावित अभोणा येथे शिक्षिका म्हणून नोकरी करत होत्या. तर दिनेश जलसंपदा विभागात कार्यरत असल्याची माहिती समोर आलीय. 

स्थानिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली अन्.. 

मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश पत्ती किर्ती आणि बहिण त्रिशा गावितसोबत नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी त्यांच्या मूळगावी नवापूर तालुक्यातील प्रतापपूरच्या दिशेने जात होते. त्यावेळी पिळकोस - कळवण येथील फाट्याजवळ दोन्ही वाहनांची मोठी धडक झाली. या घटनेची खबर मिळताच स्थानिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली.

Advertisement

नक्की वाचा >> Ahilyanagar News : नीट पेपरफुटीचा तणाव जीवावर बेतला, कर्जतच्या विद्यार्थीनीनं आयुष्य संपवलं, ती चिठ्ठी व्हायरल

मे महिन्यात दोघांनी बांधली होती लग्नगाठ

त्यानंतर जखमी झालेल्या दिनेश आणि किर्तीला कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु, उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.मे महिन्यात दोघांचं लग्न झालं होतं. दरम्यान, त्यांच्यासोबत असलेली तिसरी व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. त्रिशा गावित असं तिचं नाव आहे.  

नक्की वाचा >> Shahapur News: धबधब्यावर गेलेली कल्याणची 5 मुलं पुराच्या पाण्यात वाहून गेली, एकाचा मृतदेह सापडला, तर..