जाहिरात

Shahapur News: धबधब्यावर गेलेली कल्याणची 5 मुलं पुराच्या पाण्यात वाहून गेली, एकाचा मृतदेह सापडला, तर..

शहापूर तालुक्यातील डोळखांब-चोंढे परिसरात पुराच्या पाण्यात पाच मुलं वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली.

Shahapur News: धबधब्यावर गेलेली कल्याणची 5 मुलं पुराच्या पाण्यात वाहून गेली, एकाचा मृतदेह सापडला, तर..
Shahapur Waterfall Flood Incident News

भुपेंद्र अंबावणे, प्रतिनिधी 

Shahapur Waterfall Incident News : शहापूर तालुक्यातील डोळखांब-चोंढे परिसरात पुराच्या पाण्यात पाच मुलं वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. रेस्क्यू टीमने तिघांना वाचवलं असून बेपत्ता झालेल्या दोन मुलांच्या शोधकार्या दरम्यान एका मुलाचा मृतदेह सापडला. तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे. कल्याण येथून ही मुलं पिकनिकसाठी आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. आकाश देशमुखचा मृतदेह सापडला असून  दिनेश मेंढळकरला शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

बेपत्ता झालेल्या दिनेश मेंढळकरचा शोध सुरू

किन्हवली पोलीस स्टेशन हद्दीतील डोळखांब-चोंढे परिसरात ही घटना घडली आहे. घटनेनंतर तातडीनं रेस्क्यू टीम, किन्हवली, पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी संयुक्तपणे शोधकार्य सुरू केले. आकाश देशमुख असं मृत तरुणाचं नाव आहे. तर बेपत्ता झालेल्या दिनेश मेंढळकरचा शोध सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमधील पाच तरुणांचा ग्रुप पिकनिकसाठी गेला होता.

नक्की वाचा >> Baramati News: बारामतीत 'या' मार्गावर मोठा अपघात! सख्ख्या भावांसोबत आक्राळविक्राळ घडलं, CCTV व्हिडीओ आला समोर

'पर्यटकांनी नदी,ओढे आणि पाण्याच्या प्रवाहापासून दूर राहावे'

यावेळी मुलं पुराच्या पाण्यात वाहून गेली. रेस्क्यू टीमला आकाश देशमुखचा मृतदेह सापडला असून दिनेश मेंढळकर हा अद्यापही बेपत्ता आहे. तर इतर तीन मुल सुरक्षित असल्याची माहिती आहे. पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून प्रवाहाचा वेग वाढला आहे.

नक्की वाचा >> Mumbai News: मुंबईत खळबळ! वांद्र्याच्या 'या' प्रसिद्ध हॉटेलला ईडीचा दणका, प्रभादेवीतही मोठी प्रॉपर्टी जप्त

अशा कठीण परिस्थितीतही बचाव पथक घटनास्थळी ठाण मांडून आहे. प्रशासनाने नागरिकांना नदी, ओढे आणि पाण्याच्या प्रवाहापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com