सूरज कसबे, पिंपरी-चिंचवड
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वच पक्षांचा कस लागणार आहे. युती, आघाडी बाजूला ठेवत स्थानिक पातळीवर या निवडणुकांत निर्णय घेतले जातात. त्यामुळेच राज्यात एकमेकांच्या विरोधात असलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. भाजपला शह देण्यासाठी ही आघाडील होई शकते.
राज्यातील श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखळ्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर असलेली भाजपची एक हाती सत्ता आहे. हीच सत्ता उलथून टाकण्याच्या हेतूने दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
भाजपला रोखण्यासाठी युती करण्याबाबत दोन्ही गटाच्या शहराध्यक्षांनी देखील सहमती दर्शवली आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीकडून खेळली गेलेली ही राजकीय खेळी यशस्वी होईल का? याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे..तर दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी गटाच्या होणाऱ्या अशा राजकीय युतीचा भाजपावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं सांगत भाजप नेत्यांनी राष्ट्रवादीवर मिश्किल टिपणी केली आहे.