सुनिल दवंगे, प्रतिनिधी
Nitesh Rane On Aamir Khan : राज्यातील राजकारणात भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.राणे यांनी अभिनेता आमिर खान यांच्या तिसऱ्या लग्नावरून टीकेची झोड उठवली आहे. तसच राम मंदिर दान घोटाळ्यासह हज यात्रेतील घोटाळ्यावरही राणे यांनी मोठं विधान केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावरही त्यांनी जोरदार निशाणा साधला.नितेश राणे आज शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते.यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
नितेश राणेंचा आमिर खान यांच्यावर हल्लाबोल
आमिर खान यांनी वयाच्या 61 व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न केल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. आमिर खान हे “लव्ह जिहादचे ब्रँड अॅम्बेसेडर” बनत असल्याचा आरोप त्यांनी केला. हिंदू समाजातील तरुणांनी आमिर खान यांचे चित्रपट पाहू नयेत,असेही आवाहन त्यांनी केले.
नक्की वाचा >> Ratnagiri News : जगबुडी नदीचा पूर ओसरला, पण 'ते' संकट मात्र कायम, पाण्यात फिरतेय खतरनाक आकृती
राम मंदिर आणि हज यात्रेबाबत काय म्हणाले?
राम मंदिर दान घोटाळ्यावर आंदोलन करणाऱ्यांवरही निशाणा साधला. रामरक्षा आंदोलन छेडणाऱ्यांनी मशिदीतील कथित गैरव्यवहार किंवा हज यात्रा घोटाळ्यांबाबत का बोलत नाहीत? असा सवाल उपस्थित करत त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर टीका केली. राम मंदिराच्या मुद्द्यावर आवाज उठवणारे इतर धार्मिक संस्थांमधील कथित घोटाळ्यांवर मौन बाळगतात, असा आरोप त्यांनी केला.
नक्की वाचा >> World News : जगात सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश, हजार लोकही राहत नाहीत, यामागचं कारणंही थक्क करणारं
ठाकरे-राऊतांचाही समाचार घेतला
शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांच्यावरही राणे यांनी टीकेची झोड उठवली. पूर्वी ठाकरे कुटुंबात आणि मातोश्रीवर काड्या लावणारे राऊत आता भाजपमध्ये काड्या लावत असल्याचा आरोप त्यांनी केला. “ज्यांचा मालक साधा ग्रामपंचायतीचा सरपंचदेखील होऊ शकत नाही, ते आज इतरांना राजकारणाचे धडे देत आहेत.” अशा शब्दांत राणे यांनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला.