सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडाच्या घरांकडे यंदा नागरिकांना पाठ फिरवली आहे. म्हाडाची घरे घेण्यासाठी नागरिकांची चढाओढ असते. लाखो अर्ज म्हाडाचे घर खरेदीसाठी येत असतात. मात्र यंदा 713 घरांसाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही. तर दुसरीकडे खासगी विकासकांच्या 20 टक्क्यातील घरांना नागरिकांची पसंती दिसत आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळासाठीच्या 2264 घरांसाठीच्या लॉटरीची सोडत येत्या 5 फेब्रुवारी रोजी आहे. ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ही सोडत पार पडणार आहे. 11 ऑक्टोबर 2024 रोजी यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरु झाली होती.
(नक्की वाचा- Zepto कडून iphone युजर्सवर अन्याय? Android च्या तुलनेने वस्तू महाग विकल्या जात असल्याच आरोप)
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या योजनेतील 594 घरांसाठी 23,574 अर्ज आले आहेत. यातही नागरिकांची सर्वाधिक पसंती खासगी विकासकांच्या 20 टक्क्यातील घरांसाठी आहे. 90 टक्क्यांहून अधिक अर्ज हे खासगी विकासकांच्या 20 घरांसाठी आहेत.
(नक्की वाचा- Crime News: वारंवार OYO रुम बुक केल्याने संशय आला, जोडप्याचा कांड पाहून पोलिसही हादरले; दोघे अटकेत)
म्हाडाच्या घरांना नागरिकांचा मिळत असलेला अल्प प्रतिसाद पाहून म्हाडाने अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ देखील दिली होती. या लॉटरीची सोडत ही 27 डिसेंबर रोजी पार पडणार होती. मात्र दोनदा यासाठी मुदतवाढ देण्यात आली. मात्र याचा फारसा फायदा झाल्याचं दिसत नाही. नागरिकांना आकर्षित करण्यासाठी म्हाडाने जाहिराती देखील केल्या होत्या. अखेर म्हाडाच्या या लॉटरीची सोडत 5 फेब्रुवारी रोजी पार पडत आहे.