रेवती हिंगवे, पुणे
Pune News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. पारंपरिक वाद्यांवर यावर्षी कोणतेही खटले दाखल होणार नाहीत. ढोल ताशा महासंघ महाराष्ट्रच्या वतीने पुणे शहरातील ढोल ताशा पथकांचा प्रातिनिधीक वाद्यपूजन कार्यक्रम पार पडला. याच कार्यक्रमात पोलीसांनी हे स्पष्ट केले.
पुण्यासारखी ढोल ताशा पथके कुठेही नाहीत. पारंपरिक वाद्यांवर कोणत्याही प्रकारचे खटले नाहीत, तसे असतील तर ते नक्की थांबवू. यावर्षी पारंपरिक वाद्यांवर खटले होणार नाहीत, असा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र तर्फे पुणे शहरातील ढोल ताशा पथकांचा प्रातिनिधीक वाद्यपूजनाचा कार्यक्रम ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात पार पडला.
यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्व पथकांनी आपला सराव लवकर सुरु करुन रात्री 10 पूर्वी बंद करणे गरजेचे असल्याचं पोलिसांचं म्हणणे आहे.