जाहिरात

Kalyan News: दुर्गाडी किल्ला परिसरात नमाज, तर मंदिरात हिंदूंना प्रवेश बंदी, कल्याणमध्ये काय घडतंय?

कल्याणमधील दुर्गाडी किल्ला परिसरात बकरी ईदच्या दिवशी रस्त्यावर होणाऱ्या नमाज पठणाच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि हिंदूत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Kalyan News: दुर्गाडी किल्ला परिसरात नमाज, तर मंदिरात हिंदूंना प्रवेश बंदी, कल्याणमध्ये काय घडतंय?
Kalyan Bakari EID 2026 Latest Update

Kalyan Viral News Today : कल्याणमधील दुर्गाडी किल्ला परिसरात बकरी ईदच्या दिवशी रस्त्यावर होणाऱ्या नमाज पठणाच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि हिंदूत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.नमाजासाठी रस्त्यांचा वापर करू नये, तसेच त्या दिवशी दुर्गाडी मंदिरात हिंदू भाविकांना प्रवेश देण्यात यावा,अन्यथा हनुमान चालीसा आणि दुर्गा स्तोत्र पठणाचे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा भाजप नगरसेवक महेश पाटील आणि हिंदूवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिस प्रशासनाला दिला आहे. या संदर्भातला निवेदन कल्याण डीसीपी अतुल झेंडे यांना देण्यात आला आहे.

या संदर्भात भाजपच्या शिष्टमंडळाने कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांना निवेदन सादर केले.निवेदनात बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ला परिसरातील ईदगाहवर होणाऱ्या नमाज पठणादरम्यान परिसरातील रस्त्यावरील नमाज  आणि मंदिर प्रवेशावर निर्बंध घालण्यात येत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.नमाज पठण सुरू असताना दुर्गाडी मंदिरात हिंदू भाविकांना प्रवेश दिला जात नाही.दोन समाजात कोणत्याही प्रकारचा तेड निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांची ही भूमिका असते. 

नक्की वाचा >> Ahilyanagar News : खंडाळा परिसरात नागरिकांची धडधड वाढली, 15 दिवसांपासून मानवी वस्तीत सुरु होता भयानक प्रकार

"...अन्यथा बकरी ईदच्या दिवशी"

मागील चाळीस वर्षांपासून शिवसेना आणि आणि हिंदूत्ववादी संघटना बगरी ईदच्या दिवशी घंटानात आंदोलन करीत आहेत. त्यांची मागणी असते आम्हाला बकरी ईदच्या दिवशी मंदिरात प्रवेश बंदी का? सर्व धर्मीयांना समान वागणूक मिळाली पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. त्यासाठी पोलिसांकडून मोठा बंदोबस्तही तैनात केला जातो.

हिंदूत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे केली 'ही' मागणी

बुधवारी भाजपा नगरसेवक महेश पाटील आणि काही हिंदूत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाकडे मागणी करताना नमाजासाठी सार्वजनिक रस्त्यांचा वापर टाळण्याची व्यवस्था करावी आणि मंदिर प्रवेशावरील निर्बंध हटवावेत,असे म्हटले आहे. अन्यथा बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी परिसरात हनुमान चालीसा आणि दुर्गा स्तोत्र पठण करून आंदोलन करण्यात येईल,असा इशारा त्यांनी दिला आहे.

नक्की वाचा >> Engineering साठी भारताचे टॉप-10 कॉलेज, 12 वी नंतर 'असं' मिळेल अ‍ॅडमिशन, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस एका क्लिकवर

दरम्यान,या विषयावर अद्याप प्रशासनाकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.मात्र सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.या मागण्यांमुळे आणि आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे दुर्गाडी परिसरातील वातावरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले असून प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com