Pandharpur News: विठ्ठलाचं आषाढ महिन्यात VIP दर्शन बंद राहणार, सरकारचा मोठा निर्णय

आषाढ महिन्यात महिनाभर व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.याबाबतची माहिती सोलापूरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pandharpur Vitthal Temple VIP Darshan News

संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी

Pandharpur Vitthal Darshan latest Update : जून महिना जवळ येत असतानाच महाराष्ट्राला वेध लागतात ते पंढरपूरच्या आषाढी वारीचे.यंदाच्या वर्षी आषाढी वारीमध्ये सर्वसामान्य वारकरी भक्तांना जलद विठ्ठलाचे दर्शन घडावे.यासाठी आषाढ महिन्यात महिनाभर व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.याबाबतची माहिती सोलापूरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. त्यामुळे आषाढीला केवळ वारकरीच आता व्हीआयपी असणार आहे.इतर नेत्यांचे व्हीआयपी कल्चर पूर्णपणे बंद ठेवण्याचा मोठा निर्णय झालाय. 

पुरुषोत्तम अधिकमासात पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी

कुठल्याही आमंत्रणा शिवाय किंवा कुठल्याही निमंत्रणा शिवाय पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये किमान 15 लाख भाविक येत असतात.अशावेळी विठ्ठलाची दर्शन रांग सहा ते सात किलोमीटर लांब पर्यंत जाते.विठ्ठलाच्या दर्शनासाठी 15 तासांचा कालावधी लागतो.यामध्येच राज्यातील आमदार, खासदार, अधिकारी, उद्योगपती किंवा त्यांचे संबंधित व्हीआयपी लोकांची मोठी रेलचेल विठ्ठल दर्शनासाठी असते. व्हीआयपी दर्शनाचा मोठा तणाव श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीवर देखील येतो.यासाठी आषाढीच्या काळात व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात येत असते.

Advertisement

नक्की वाचा > Konkan News: 'या' तारखेपासून कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ होणार बंद, कधी होणार सुरु?

व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय का घेतला?

मात्र यंदा संपूर्ण आषाढ महिनाभर व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याने.पर्वकाळात भक्तांना जलद दर्शन मिळणार आहे. सध्या पुरुषोत्तम अधिकमास असल्याने पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी आहे.सध्याही संपूर्ण महिना विठ्ठलाचे व्हीआयपी दर्शन बंद असणार आहे.अशातच आषाढ महिन्यातही व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन वारकरी भक्तांना सुखकर भक्तीचा मार्ग खुला करण्याचे काम ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून झालेले दिसून येते.

नक्की वाचा >> Pune News: पुण्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना,18 वर्षीय तरुणीचा जीवनप्रवास संपला, CET परीक्षेनंतर काय घडलं?