यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune Girl Crime News: पुणे शहरातील लोहगाव परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.सीईटी परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून 18 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.दुर्वा दत्तात्रय खांदवे असं मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी तिने राहत्या घरात गळफास घेत जीवन संपवले.
अखेर नैराश्यातून तिने टोकाचे पाऊल उचलले अन्..
मिळालेल्या माहितीनुसार,दुर्वा ही शिक्षणात हुशार विद्यार्थिनी होती.खासगी शिक्षण संस्थेच्या प्रवेशासाठी दिलेल्या सीईटी परीक्षेत अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही.त्यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होती.अखेर नैराश्यातून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.दुर्वाचे वडील दत्तात्रय खांदवे हे नोकरदार असून आई गृहिणी आहे. साध्या कुटुंबातील दुर्वाच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.घटनेची माहिती मिळताच लोहगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
नक्की वाचा >> Pune News: पुण्यातील 'त्या' ठिकाणचे सर्व रस्ते केले बंद, परिसरात तणावाचे वातावरण, नेमकं काय घडलंय?
मानसिक आरोग्याचे प्रश्न गंभीर होतायत
याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.दरम्यान,विद्यार्थ्यांवरील वाढता शैक्षणिक ताण आणि यश मिळवण्याचा दबाव यामुळे मानसिक आरोग्याचे प्रश्न गंभीर होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.या घटनेनंतर विद्यार्थ्यांना योग्य समुपदेशन आणि मानसिक आधार देण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world