'मर्सिडीस बेंझ'ला महाराष्ट्र शासनाची नोटीस, काय आहे नोटीसमध्ये?

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीसमध्ये म्हटलं की, कंपनीकडून नियमांचे पालन होत नाही. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील क्लॅरिफायर्स आणि सेंट्रीफ्यूज युनिट काम करत नाहीत.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कुलकर्णी, पुणे

मर्सिडीज बेंझ कंपंनीच्या चाकणमधील प्रकल्पाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 20 सप्टेंबर रोजी नोटीस बजावली आहे. पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका कंपनीवर आहे. कंपनीला या नोटीसला उत्तर देण्यासाठी 15 दिवसांचा मुदत देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीची महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांना मर्सिडीज बेन्झ प्रकल्पाला भेट दिली होती. त्यांचा दौरा वादात सापडला होता. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी 23 ऑगस्ट व 4 सप्टेंबरला या प्रकल्पाला भेट देऊन तपासणी केली होती. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीसमध्ये म्हटलं की, कंपनीकडून नियमांचे पालन होत नाही. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील क्लॅरिफायर्स आणि सेंट्रीफ्यूज युनिट काम करत नाहीत. डिझेल इंजिनांसाठीची उत्सर्जन नियंत्रण उपकरणे बसवण्यास सांगूनही त्याचे पालन केलेले नाही. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प योग्यरित्या चालवला जात नाही आणि त्याची देखभालही केली जात नाही. 

( नक्की वाचा : रविंद्र चव्हाणांना वाढदिवशीच कुणी डिवचलं? डोंबिवलीत लागलेल्या बॅनरमुळे खळबळ )

कंपन्या पर्यावरण नियमांचे पालन करत आहेत की नाहीत, याची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तपासणी केली जाते. मंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी ही तपासणी करतात. मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम हे 23 ऑगस्टला पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यांनी अचानक मंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन मर्सिडीज बेन्जच्या चाकणमधील प्रकल्पाची पाहणी केली. 

( नक्की वाचा : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी आता नवी तारीख, हायकोर्टाकडून विनंती मान्य )

या नोटीसबाबत मर्सिडीज बेंझ म्हटलं की, "महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस कंपनीला मिळाली आहे. या नोटिशीतील मुद्द्यांचा अभ्यास करून तिला उत्तर देण्यात येईल. आमची शासकीय यंत्रणांना सहकार्य करण्याची भूमिका आहे."

Advertisement

मर्सिडीज बेन्च प्रकल्पाच्या भेटीबाबत आणि नियमांच्या उल्लंघनाबद्दल त्यांनी समाज माध्यमांवर पोस्ट केली होता. मात्र काही वेळातच त्यांनी ती पोस्ट काढून टाकण्यात आल्याने या भेटीचे नेमके प्रयोजन काय होते, असा प्रश्न उपस्थित झाला होता.

Topics mentioned in this article