जाहिरात

31st December : 31 डिसेंबरला रात्रभर करा एन्जॉय, पहाटेपर्यंत मुंबईत हेरिटेज टूर; बस-ट्रेनचं नियोजन कसं असेल?

३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता एखाद्या समुद्रकिनारी, मरीनलाइन्सला किंवा पर्यटनस्थळी  असावं असं अनेकांना वाटतं. त्यानुसार बस आणि ट्रेनचं नियोजन करण्यात आलं आहे.

31st December : 31 डिसेंबरला रात्रभर करा एन्जॉय, पहाटेपर्यंत मुंबईत हेरिटेज टूर; बस-ट्रेनचं नियोजन कसं असेल?

December 31st night train and bus schedule : घरोघरी नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. ३१ च्या रात्री काहीजण घरातच राहणं पसंत करतात तर अनेकांचं बाहेर फिरण्याचं प्लानिंग असतं. ३१ च्या रात्री १२ वाजता एखाद्या समुद्रकिनारी, मरीनलाइन्सला किंवा पर्यटनस्थळी  असावं असं अनेकांना वाटतं. त्यानुसार तयारीही केली जाते. ३१ चं सेलिब्रेशन लक्षात घेऊन बेस्ट बस आणि लोकलच्या नियोजनानुसार महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. ज्यामुळे तुम्ही ३१ ची रात्र मनसोक्त घराबाहेर बागडू शकाल आणि नववर्षाचा आनंद घेऊ शकाल. 

२५ अतिरिक्त बसचं नियोजन, पहाटेपर्यंत हेरिटेज टूर

३१ च्या रात्री उशिरापर्यंत नागरिक घराबाहेर असतील हे लक्षात घेऊन २५ अतिरिक्त बस चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे थर्टी फर्स्टला रात्री उशीरापर्यंत हेरिटेज टूर करता येणार आहे. १ जानेवारीला पहाटेपर्यंत हेरिटेज टूर सुरू राहील. बेस उपक्रमातर्फे विविध बसमार्गार रात्री २५ जादा बस सोडण्यात येणार आहे. 

कोणत्या मार्गांवर असेल सुविधा...

ए २१ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (म्युझियम) ते देवनार आगार 
बससंख्या - ३ 

सी ८६ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (म्युझियम) ते वांद्रे बसस्थानक (प.) 
बससंख्या - ३

ए ११२ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (म्युझियम) ते सीएसएमटी. 
बससंख्या - ५

२०३ - अंधेरी स्थानक (प) - जुहू बीज - २ 

२३१ - सांताक्रुझ (प) - जुहू 
बस स्थानक - ४

ए २४७ आणि ए २९४ - बोरिवली स्टेशन ते गोराई बीच आणि गोराई बीच ते बोरिवली स्टेशन - २ 

२७२ मालाड स्टेशन - मार्वे बीच - २ 

शरीरात अल्कोहोल किती काळ टिकतो? चाचणीत दारू किती काळापर्यंत आढळून येते? वाचा सविस्तर

नक्की वाचा - शरीरात अल्कोहोल किती काळ टिकतो? चाचणीत दारू किती काळापर्यंत आढळून येते? वाचा सविस्तर


रेल्वे किती वाजेपर्यंत सुरू राहील...

न्यूज एजन्सी आयएनएसने दिलेल्या माहितीनुसार, हार्बर लाइनवर पहिली विशेष ट्रेन १.३० वाजता सीएसएमटीवरुन रवाना होईल आणि २.५० वाजता पनवेलला पोहोचेल. दुसरी विशेष ट्रेन १.३० वाजता पनवेलहून सुटेल आणि २.५० वाजता सीएसएमटीला पोहोचेल. या ट्रेन सर्व स्टेशनवर थांबतील. त्याशिवाय सेंट्रल रेल्वेवरील मुख्य मार्गावर विशेष ट्रेन ३१ डिसेंबर २०२५ ते १ जानेवारी २०२६ च्या रात्री १.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून रवाना होईल आणि ३ वाजता कल्याणला पोहोचेल. दुसरी विशेष ट्रेन १.३० वाजता कल्याणहून सुटेल आणि ३ वाजता सीएसएमटीला पोहोचेल.  

मेट्रो कितीवाजेपर्यंत सुरू राहील..

मेट्रो ३ च्या वेळापत्रकानुसार, ३१ डिसेंबरला सकाळी ५.५५ वाजता पहिली मेट्रो सेवेत दाखल होईल. याशिवाय रात्री १०.३० वाजल्यानंतरही मेट्रो ३ ची सेवा रात्रभर सुरू राहील. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com