जाहिरात

Orange Gate-Marine Drive : रेल्वे खाली भुयारी मेट्रो नंतर बोगदा; मुंबईच्या 'पोटात' इंजिनियरिंगचा चमत्कार 

Orange Gate-Marine Drive Double Tunnel Project : या नव्या प्रकल्पामुळे मुंबईतील पूर्व-पश्चिम उपनगरे, नवी मुंबई भुयारी मार्गाद्वारे जोडले जातील. यामुळे प्रवासाचा वेळ १५ ते २० मिनिटांनी कमी होणार आहे. 

Orange Gate-Marine Drive : रेल्वे खाली भुयारी मेट्रो नंतर बोगदा; मुंबईच्या 'पोटात' इंजिनियरिंगचा चमत्कार 

ऋतिक गणकवार, प्रतिनिधी

Orange Gate-Marine Drive Double Tunnel Project : मुंबई महानगर क्षेत्रातील वाढती वाहतूक मागणी आणि वाहतुकीच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दक्षिण मुंबईतील (कुलाबा) ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह या मुंबई शहरातील भूमिगत रस्त्याचं बांधकाम हाती घेतलं आहे. या प्रकल्पाच्या कामाला आजपासून सुरुवात होणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईतील पूर्व-पश्चिम उपनगरे, नवी मुंबई भुयारी मार्गाद्वारे जोडले जातील. यामुळे प्रवासाचा वेळ १५ ते २० मिनिटांनी कमी होणार आहे. 

कसा असेल हा प्रकल्प?

हा भारतातील पहिला शहरी बोगदा प्रकल्प असून तो घनदाट लोकवस्ती असलेल्या भागाखालून तसेच मध्य, पश्चिम रेल्वे आणि मुंबई मेट्रो लाईन ३ (अॅक्वा लाईन) च्या ५० मीटर खालून जातो. प्रकल्पाची एकूण लांबी ९.९६ किमी आहे. ज्यामध्ये जवळपास ७ किमी भुयारी मार्ग आहे. प्रत्येक बोगद्यात ३.२ मीटर रुंदीचे २ पदरी रस्ते, १ पदरी आपत्कालीन रस्ता असेल. दोन्ही बोगद्यांमध्ये वेग मर्यादा वेग ८० किमी/तास इतकी असेल. दोन्ही बोगदे सुरक्षिततेच्या दृष्टीने एकमेकांशी प्रत्येकी ३०० मीटर अंतरावर क्रॉसपॅसेजद्वारे जोडले जातील. 

बोगद्यांमध्ये हवा खेळती राहण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या क्षमतेचे यांत्रिकीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. आग प्रतिरोधक यंत्रणा, पुरेशा प्रमाणात प्रकाश व्यवस्था, सुयोग्य आणि आधुनिक पद्धतीने वाहतूक विनिमयासाठी इन्टेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टम (ITS) इत्यादी बाबींचे प्रयोजन आहे. प्रकल्पाच्या जमिनीखालील संरेखनामुळे भू-संपादन कमी होते. शहरी वातावरण जपते आणि शहरात कमीत कमी व्यत्यय सुनिश्चित करते. हा प्रकल्प मुंबई किनारी रस्ता प्रकल्प आणि अटल सेतू सारख्या प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांशी जोडला जातो.

Vande Bharat Sleeper Train Route: देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कुठे धावणार? याच महिन्यात सुरुवात होण्याची दाट शक्यता

नक्की वाचा - Vande Bharat Sleeper Train Route: देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कुठे धावणार? याच महिन्यात सुरुवात होण्याची दाट शक्यता

प्रकल्पाविषयी - 

प्रकल्पाचा खर्चः १८,०५६ कोटी

पूर्णत्वाचा कालावधीः ५४ महिने

प्रकल्पाचे मुख्य फायदे

मुंबईतील पूर्व-पश्चिम उपनगरे आणि नवी मुंबई या भुयारी मार्गाद्वारे जोडली जाईल.

प्रवासाचा वेळ १५-२० मिनिटांनी कमी होईल.

इंधनाची बचत होईल.

तसेच ध्वनी आणि वायु प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

बोगद्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान

या प्रकल्पासाठी वापरण्यात येणारी यंत्रणा स्लरी शील्ड प्रकारची टनेल बोरिंग मशीन (Slurry Type TBM) असून ही उच्च तंत्रज्ञानावर आधारित आहे. मुंबईच्या किनारी भूगर्भातील मिश्र आणि खडकाळ भूस्तराकरीता अचूक व सुरक्षित खोदकाम करणारी यंत्रणा आहे. हे तंत्रज्ञान मुंबई कोस्टल रोड प्रकल्पात देखील वापरण्यात आले असल्याने कार्यक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे.

टनेल बोरिंग मशीन (TBM)

प्रकल्पासाठी वापरले जाणाऱ्या टीबीएमचे नूतनीकरण आणि पुर्ननिर्मितीची कामं स्थानिक पातळीवर मूळ टनेल बोरिंग मशीन उत्पादक (OEM) यांचा देखरेखीत करण्यात आले आहे.

कटर हेड व्यासः १२.१९ मीटर

लांबी: ८२ मीटर

वजनः अंदाजे २, ४०० मेट्रिक टन.

सद्यस्थिती

सद्यस्थितीत प्रकल्पाची भौतिक प्रगती १४% आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com