Exclusive: देश सुरक्षित हातात, मग अशा घटना का होतात? वीर योद्धे नायक दीपचंद यांचा क्रोध

आपला देश सुरक्षित नेतृत्वाच्या हातात आहे, तर मग अशा घटना का होतायत? एक माजी सैनिक म्हणून याचे दुःख होते, असं नायक दिपचंद यांनी सांगितलं.

जाहिरात
Read Time: 4 mins
नाशिक:

पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. त्यावर कारगिल योद्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नायक दिपचंद यांनी संताप व्यक्त केला आहे. NDTV मराठीशी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ही मुलाखत ऐकल्यावर तुमचं रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही. मोदीजी बैठका, चर्चा करण्याची वेळ गेली. आता फक्त तुम्ही सैन्याला 'गो' असा आदेश द्या. लोहा गरम हे, मार दो हातोडा. अभी नहीं तो कभी नही. असं मत त्यांनी व्यक्त केलं.  पाकिस्तान हा जखमी साप असून तो डसणारच. आता युद्धच हवे असून POK वर ताबा मिळवायला भारतीय सैन्याला फक्त दोन दिवस लागतील, असं ही ते म्हणाले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पहलगाम हल्ल्या मागे पाकिस्तानच्या जर्नलचा हात असू शकतो, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. गंगा जमूनाची शपथ आपणच घ्यायची का ? किती वेळा माफ करायचे ? असा प्रश्नही त्यांनी केला आहे. हिंदूंनो आता तिरंग्यासाठी एक होण्याची वेळ आली आहे. तलवारी घेऊन सैन्याच्या मदतीला बॉर्डरवर पोहोचा. वाटलं तर आमच्या माजी सैनिकांची पेन्शन कापा,या घटनेत आपल्याच काही नागरिकांचा किंवा राजकारण्यांचा सहभाग असू शकतो असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. त्या गद्दारांना आधी शोधा असं ही ते म्हणाले. नायक दीपचंद यांनी कारगिल युद्धात शौर्य गाजवलं होतं. ते 1889 मिसाईल रेजिमेंटचे सदस्य होते. ऑपरेशन विजयमध्ये त्यांनी तोलोलिंगवर पहिला गोळा डागण्याची कामगिरी केली होती.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Pahalgam Attack: "भारतातील सर्व पाकिस्तानींची ओळख पटवा...", अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना आदेश

पहलगाममध्ये झालेला हल्ला हा आमच्या आत्म्यावरचा हल्ला आहे. देशवासीय सुरक्षित नाहीत. या घटनेत आपल्याच काही नागरिकांचा किंवा राजकारण्यांचा सहभाग आहे, असा आरोप करताना, काहीतरी माहिती पुरवल्या गेल्याशिवाय हे शक्य नाही. त्या गद्दारांना आधी शोधले पाहिजे. यापूर्वी सैनिकावर हल्ले झाले. पण पर्यटकांवर पहिल्यांदाच झाला. तो ही मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाममध्ये, हे खूप दुःखद आहे. हिंदू आहे की मुस्लिम हे विचारले गेले, आतंकवादीला जात नसते म्हणतात, पण यात हिंदू-मुस्लिम झाले असं ही ते म्हणाले.  पाकिस्तानच्या जर्नलने काही दिवसांपूर्वी भाषण दिले होते हिंदू मुस्लिमवर, त्यामुळे त्यांचा यात सहभाग असू शकतो असं ही ते म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Pahalgam Attack: दहशतवाद्याचा फोटो काढणारी महिला आली समोर; रुद्राक्ष आणि कुराणवरुन झाला होता वाद

भारत पाकिस्तान बॉर्डरपासून पहलगाम जवळ आहे. हिंदूंच्या अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार होती. ही यात्रा पहलगाम पासूनच जाते. सैन्य तिथे कमी करण्यात आले होते. 2 हजार पर्यटक तिथे असतांना तिथे सुरक्षा व्यवस्था का नव्हती? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. या घटनेवर आता पिक्चर पण निघेल. मनोरंजन पण होईल, पण ज्यांनी या घटनेत आपलं लोक गमावले त्यांचे काय ? असं ही ते म्हणाले. काल एक लहान मुलगा बोलला की, सैन्याला ऑर्डर द्या आणि ज्यांनी माझ्या वडिलांना मारले त्यांना सोडू नका. अभी नही तो कभी नहीं, आपल्या सेनेकडे सगळे प्लॅनिंग आहे. ताकद आहे.आपल्याला आता एक हनुमान हवा जो लंका जाळून परत येईल. आपल्याकडे आजही अर्जुन आहे तर मग अभिमन्यू का मरताय? असं ही ते म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Kashmir Pahalgam terror attack : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 700 पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिकांचं वास्तव्य

आपला देश सुरक्षित नेतृत्वाच्या हातात आहे, तर मग अशा घटना का होतायत? एक माजी सैनिक म्हणून याचे दुःख होते.हे बघून काय तमाशा सुरू आहे ?  सैन्याला मातृभूमीसाठी काहीतरी करायचे असते. दोन दिवसात POK आपल्या हातात येईल. फक्त सेनेला आता तुम्ही मूव्ह सांगा. ऑर्डर द्या. पूर्ण विश्व आपल्यासोबत आहे. मोदीजी लोकं तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवतील. तुम्ही फक्त सेनेला ऑर्डर द्या, होऊ द्या दोन दोन हात, सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पण ते हल्ले करताच? उरी, पठाणकोट, पुलवामा झाले. पाकिस्तान हा घायल साप आहे, त्यांना तुम्ही सोडले तर ते डसणारच असं ही त्यांनी स्पष्ट पणे सांगितले. आर्मीला ऑर्डर द्या, मिटिंग चर्चा वगैरे सोडा. ती वेळ गेली आता फक्त ठोका, हीच संधी आहे. अशा भावनाही त्यांनी या निमित्ताने व्यक्त केला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Seema Haider: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरला ही सोडावा लागणार देश? कायदा काय सांगतो?

पाकिस्तान स्वतःहुन आपला गुन्हा कधी ही कबूल करणार नाही.  26-11 च्या हल्ल्यात करोडो रुपये खर्च केले, पाकिस्तान हल्ल्यात हात आहे म्हणून पुरावे दाखवले. भारतीय सैन्य सक्षम आहे, हीच संधी आहे. चखने को और पकडने को भी मजा आयगा. ना बजेगी बास ना बजेगी बासरी, मोदीजी फक्त ऑर्डर द्.या फक्त एक युद्ध करा. आता होऊन जाऊ द्या. मोदीजी तुम्ही असताना POK आपल्या ताब्यात आला, हे येणाऱ्या अनेक पिढ्या लक्षात ठेवतील. त्यानंतर अशा घटना होणार नाहीत. बांगलादेश वेळी इंदिरा गांधींनी पण तेव्हा ऐकले नव्हते. तुम्ही पण आता निर्णय घ्या. हिंदू मुस्लिम म्हणून जे तरुण तलवारी हातात घेत होते, त्यांनी आता बॉर्डरवर पोहोचा. महादेवाचे नाव घ्या, सैन्याला साथ द्या असे आवाहन ही त्यांनी या निमित्ताने केले आहे.