
Amit Shah on Pahalgam Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरोधात अॅक्शन मोडमध्ये आहे. भारताने सर्वच आघाड्यांवर पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर भारत सरकारने आता देशातील सर्व पाकिस्तानीविरोधात कडक उचलल्याची माहिती आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारतातील सर्व पाकिस्तानींची ओळख पटवा आणि त्यांना परत पाकिस्तानात पाठवा, असे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
(नक्की वाचा- Pahalgam Attack: दहशतवाद्याचा फोटो काढणारी महिला आली समोर; रुद्राक्ष आणि कुराणवरुन झाला होता वाद)
गृह मंत्रालयाने राज्यांना त्यांच्या अधिकारक्षेत्रात राहणाऱ्या किंवा राहत असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना ओळखून त्यांना देशाबाहेर पाठवण्यास सांगितले आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी वैयक्तिकरित्या याबाबत चर्चा केली आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाच टप्प्यांच्या राजनैतिक हल्लाचा भाग म्हणून भारताने बुधवारी पाकिस्तानी नागरिकांचे सर्व व्हिसा रद्द केल्याचे सांगण्यात येत आहे.
(नक्की वाचा - आम्ही टिकल्या काढल्या अन् 'अल्लाह हू अकबर' म्हणायला लागलो, गणबोटेंच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव)
पाकिस्तानविरोधात 5 मोठे निर्णय
याआधी भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आला आहे, अटारी सीमेवरून होणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत आणि त्यांना ४८ तासांच्या आत देश सोडावा लागेल. या लेखात आपण मोदी सरकारने घेतलेल्या कृतींचे तपशील समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि नंतर या निर्णयांचा परिणाम जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world