
Pahalgam Terrorist Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. गुरुवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत सुरक्षेतील त्रुटींशी संबंधित प्रश्नांची उत्तरे सरकारने दिली. एनआयए सोबतच, इतर विविध एजन्सी या हल्ल्याचा तपास करत आहेत. दरम्यान, पहलगाम हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याचा फोटो काढणारी महिला समोर आली आहे. जौनपूर येथील एकता तिवारी या महिलेने दावा केला की, ज्या दहशतवाद्यांचे स्केच तपास यंत्रणेने बनवले आहेत, त्यांच्याशी आमचा वाद झाला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांचे रेखाचित्र प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती आहे. तिन्ही दहशतवाद्यांवर प्रत्येकी 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील रहिवासी एकता तिवारी, ज्या नुकत्याच जम्मू आणि काश्मीरहून परतल्या आहेत. त्यांनी दावा केला आहे की ज्या दहशतवाद्यांचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत त्यापैकी दोन दहशतवाद्यांची तिच्या गटाशी बाचाबाची झाली होती.

एकता तिवारींनी म्हटलं की, "आमचा 20 जणांचा गट 13 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यासाठी गेला होता. आम्ही 20 एप्रिल रोजी पहलगामला पोहोचलो. त्याच दिवशी आम्हाला काहीतरी संशयास्पद वाटले आणि म्हणून आम्ही सर्वजण हल्ला क्षेत्र, बैसरनच्या सुमारे 500 मीटर आधीच खाली उतरलो. आजूबाजूच्या काही लोकांचे वागणे योग्य वाटत नव्हते, ते आम्हाला कुराण वाचण्यास सांगत होते."
(नक्की वाचा - आम्ही टिकल्या काढल्या अन् 'अल्लाह हू अकबर' म्हणायला लागलो, गणबोटेंच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव)
Jaunpur, Uttar Pradesh: Ekta Tiwari, tourist who identified the terrorist says, "We were a group of 20 people and reached Pahalgam on April 20. That very day, we sensed something suspicious, so we got off about 500 meters before the Baisaran area—where the attack took place. The… pic.twitter.com/vZGKSbCqhK
— IANS (@ians_india) April 24, 2025
कुराण वाचायला येतं का? रुद्राक्ष का घालता?
एकता यांना त्या दिवशी काय घडलं याबाबत सांगितलं की, "आम्ही खेचरांवर चढत असताना, दोन लोक आम्हाला भेटले होते. त्यांनी आमच्या गटात किती लोक आहेत हे देखील विचारले. आम्ही कोणत्या धर्माचे आहोत हे देखील त्यांना विचारले. आम्हाला कुराण वाचायला येतं का? रुद्राक्ष का घालता? हे देखील विचारले. जेव्हा माझ्या भावाने सांगितले की त्याला रुद्राक्ष घालायला आवडतो, तेव्हा त्यांनी आमच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. मात्र आम्ही वाद न वाढवता तेथून खाली उतरलो आणि इतर खेचर चालकांच्या मदतीने परतलो."
( नक्की वाचा : Pahalgam Terror Attack : पाकिस्तान पाण्यासाठी तडफडणार; भारताचे 5 निर्णय पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणार )
"'प्लान ए' फेल झाला"
एकता तिवारींनी दावा केला की, "त्यानंतर लगेचच त्यांच्यापैकी एका व्यक्तीला कुणाचातरी फोन आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने सांकेतिक शब्दात 'प्लान ए' फेल झाल्याचे सांगितलं. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने खोऱ्यात 35 बंदुका पाठवण्याबद्दलही म्हटलं. या सर्व घडामोडींमुळे आमचा संशय आणखी वाढला. माझ्याकडे त्या मुलाचा फोटो आहे जो 35 बंदुकींबद्दल बोलला होता आणि दहशतवाद्यांचे रेखाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर मी त्याला ओळखले आहे."
VIDEO : "Pahalgam Terror Attack मागे पाकिस्तानी लष्करप्रमुख
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world