जाहिरात

Exclusive : पाकिस्तानने भारतावर अण्वस्त्रे डागली असते तर काय झाले असते?

शत्रूची खुमखुमी जिरवायची असेल तर त्यासाठी तीनही सैन्यदले आणि राजकीय नेतृत्व यांच्यात समन्वय असणे गरजेचे असते, हा समन्वय भारताकडे होता. 

Exclusive : पाकिस्तानने भारतावर अण्वस्त्रे डागली असते तर काय झाले असते?

Operation Sindoor : भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावानंतर जगभर चिंतेचे वाचावरण निर्माण झाले होते. हे दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज देश असून ते आमनेसामने उभे ठाकतात तेव्हा ती चिंतेची बाब असते असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. पाकिस्तान हा अविवेकी आणि वाट्टेल ते आचरट निर्णय घेणारा देश आहे. यामुळे पाकिस्तानने जर भारताच्या दिशेने अण्वस्त्रसज्ज मिसाइल सोडले असते तर काय झाले असते ? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. ऑपरेशन सिंदूर सुरू असताना संरक्षण मंत्रालयाचे प्रधान सल्लागार म्हणून काम पाहणारे लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे (निवृत्त) यांना हा प्रश्न विचारला असता त्यांनी याचे उत्तर दिले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पाकिस्तानची खुमखुमी अवघ्या काही तासांत संपली

खंदारे यांनी NDTV मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये सांगितले की, असा कोणताही तणाव निर्माण होतो तेव्हा समोरच्याची विल टू फाईट म्हणजेच लढायची खुमखुमी संपवायची असते. भारताने पाकिस्तानची खुमखुमी अवघ्या 80-82 तासात संपवली.  शत्रूची खुमखुमी जिरवायची असेल तर त्यासाठी तीनही सैन्यदले आणि राजकीय नेतृत्व यांच्यात समन्वय असणे गरजेचे असते, हा समन्वय भारताकडे होता. 

(नक्की वाचा-  Exclusive: देशाची जनता पुरावे मागते, यापेक्षा ट्रॅजेडी काय? Operation Sindoor जवळून पाहिलेल्या माजी लष्करी अधिकाऱ्याचा सवाल)

एअरफिल्ड उद्ध्वस्त होताच पाकिस्तानची टरकली

पाकिस्तानने भारतातील सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरूवात करताच भारताने पाकिस्तानच्या लष्करी तळांवर हल्ला केला. स्कार्दू, रावळपिंडी, सरगोदा, जकोबाबाद हे आणि यासारख्या 11 एअरफिल्डना भारताकडून लक्ष्य करण्यात आले. लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे (निवृत्त) यांनी सांगितले की,  स्कार्दू हा पाकिस्तानातील पंजाबमधला भाग आहे. पाकिस्तानातील सैन्य दलातील बहुतांश वरिष्ठ अधिकारी हे पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील आहेत.  रावळपिंडीजवळ पाकिस्तानी सैन्याचे मुख्यालय आहे. जकोबाबादमध्ये F16 लढाऊ विमाने उभी असतात. बोलारीमध्ये सगळ्यात आधुनिक एअरफिल्ड आहे, जे 2026 साली तयार करण्यात आले होते. तिथल्या हँगरचे नुकसान झाले असून एक विंग कमांडर गेल्याचे पाकिस्ताननेच सांगितले आहे. भारताच्या हल्ल्यात आपले किती नुकसान होतंय हे त्यांनी पाहीलं आणि त्यांनी तत्काळ थांबण्याचा निर्णय घेतला. 

भारताने केली मोठी कोंडी

भारताने पाकिस्तानी हवाई दलाच्या तळांवर हल्ला करताना बारकाईने नियोजन केले होते. उत्तरेकडील स्कार्दूपासून दक्षिणेकडील बोलारीपर्यंत एका विशिष्ट रितीने 11 तळ उडवण्यात आले. हा हल्ला करताना हवाईपट्टीचे नुकसान करण्यात आले होते. रनवे लक्ष्य करण्याचे उद्दीष्ट्य एकच होते की तिथून विमाने उडू नये आणि उडाली असतील तर पुन्हा लँड करू नयेत. पूर्वी पाकिस्तानला अफगाणिस्तानमध्ये आसरा घेणे शक्य होते, मात्र तालिबानशी संबंध बिघडल्याने तिथेही पाकिस्तानी विमाने उतरू शकत नव्हती. एकप्रकारे भारताने पाकिस्तानची नीटपणे कोंडी केली होती. यामुळे पाकिस्तानला थांबण्याशिवाय दुसरा पर्यायच राहीलानाही असे लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे (निवृत्त) यांनी सांगितले.

(नक्की वाचा-  Jyoti Malhotra: 'माझं लग्न पाकिस्तानात...', गुप्तहेर ज्योती अन् ISI ऐजंट अलीचं वॉट्सअप चॅट आलं समोर)

खंदारे यांनी सांगितले की जर पाकिस्तानने अण्वस्त्र हल्ल्यासाठी क्षेपणास्त्र डागले असते तर आपण ते आधीच उडवले असते आणि त्यांच्याच देशात उडवले असते.  आम्ही सगळ्या गोष्टीं विचारात ठेवून प्लॅनिंग केले होते ज्यात पाकिस्तान अण्वस्त्रांचा मारा करण्याच्या शक्यतेचाही विचार केला गेला होता असे खंदारे यांनी म्हटले आहे.गंमतीचा भाग असा आहे की भारतापुढे सपशेल शरणागती पत्करल्यानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी स्वत:ला फिल्ड मार्शल म्हणून घोषित केले. सगळे जण त्यांची खिल्ली उडवत असून ते फिल्ड नाही तर फेल्ड मार्शल असल्याचे म्हणत त्यांची भंकस केली जाऊ लागली आहे. 

विमानं आणून देणार आहात का?

या तणावादरम्यान पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याचे दावे केले होते. यासाठीचे त्यांनी कोणतेही पुरावे दिले नव्हते. पाकिस्तानने आपली विमाने पाडली का? असा सवाल भारतातील काही नेत्यांनी विचारला होता. याबद्दल बोलताना खंदारे यांनी म्हटले की, विमानं किती पाडली किंवा पडली हे सांगितलं तर तुम्ही काय कराल, विमान आणून देणार आहात का ? विमान आणून देण्याची तुमची कुवत असेल तर प्रश्न विचारा. युद्ध सामुग्री खरेदीवरून होणाऱ्या राजकारणाबद्दल बोलताना ते म्हणाले की, आम्ही ती सामुग्री घेतो, लढतो आणि जिंकतो. यावरून ज्याला राजकारण करायचे त्याने करावे, आम्हाला त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही. राफेल हे सर्वोत्तम असल्याचेही त्यांनी सांगितले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com