जाहिरात

Rain Update: धोका वाढला! हवामान विभागाच्या गंभीर इशाऱ्यानंतर उद्या 'या' जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेजला सुट्टी

Palghar Rain Update: जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Rain Update: धोका वाढला! हवामान विभागाच्या गंभीर इशाऱ्यानंतर उद्या 'या' जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेजला सुट्टी
Palghar Rain Update: जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था गुरुवारी बंद ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
पालघर:

मनोज सातवी, प्रतिनिधी

Palghar Rain Update: हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यामुळे पालघर जिल्ह्यासाठी उद्याचा दिवस (गुरुवार 2 जुलै 2026) अत्यंत महत्त्वाचा आणि काळजीचा आहे. संपूर्ण जिल्ह्यात उद्या अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. संभाव्य मुसळधार पावसाचा धोका लक्षात घेऊन पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

पालघरच्या जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी या संदर्भात अधिकृत आदेश जारी केले आहेत. हवामान खात्याचा अंदाज आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था गुरुवारी बंद ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. पालघरमध्ये आज दिवसभर पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळाली असून अनेक सखल भागांमध्ये आधीच पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील कोणतीही आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने हा खबरदारीचा उपाय योजला आहे.

पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांत पालघर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अतिमुसळधार ते अत्यंत तीव्र स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, पोलीस प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने मदतकार्य सुरू करता यावे, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

( नक्की वाचा : Rain Update: नालासोपाऱ्यात रस्त्यांच्या झाल्या नद्या; वसईत नाल्याच्या पुरात कार वाहून जातानाचा VIDEO VIRAL )

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

प्रशासनाकडून नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे की, हवामानाचा अंदाज घेऊन आणि अत्यंत आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे. नदी, नाले आणि सखल भागांच्या परिसरात जाणे टाळावे, तसेच सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीचा आधार घ्यावा. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com