जाहिरात

पालघरमध्ये पावसाचा हाहाकार! डहाणू-विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प; पश्चिम, मध्य, हार्बर लोकलची स्थिती काय?

Railway Update: पालघर जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डहाणू आणि तलासरी तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेची डहाणू ते विरार दरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद झाली आहे.

पालघरमध्ये पावसाचा हाहाकार! डहाणू-विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प; पश्चिम, मध्य, हार्बर लोकलची स्थिती काय?

पालघर जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या संततधार आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. डहाणू आणि तलासरी तालुक्यांत पूरस्थिती निर्माण झाली असून, मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहेत. या अतिवृष्टीचा सर्वात मोठा फटका पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीला बसला आहे. उमरगाव-घोलवड विभागात रेल्वेमार्गावर पाणी साचल्यामुळे डहाणू रोड ते विरार दरम्यानची लोकल ट्रेन सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

मुंबई लोकल सेवांची सद्यस्थिती

पश्चिम रेल्वे 
डहाणू ते विरार लोकल सेवा पूर्णपणे बंद.
विरार ते चर्चगेट दरम्यान उपनगरीय सेवा वाणगावपर्यंतच सुरू असून लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत.

मध्य रेल्वे
लोकल ट्रेन 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू आहेत.

हार्बर रेल्वे 

लोकल 5 ते 10  मिनिटे उशिराने धावत आहेत.

(नक्की वाचा- Ketan Agrawal Case: केतनचा जीव वाचला असता; सिया आणि चेतनने पोलिसांना सांगितला 'प्लॅन A')

लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम 

उमरगाव आणि घोलवड दरम्यान रुळांवर पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वेने अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. 93002 डहाणू रोड – चर्चगेट ही गाडी 23 जुलै रोजी रद्द करण्यात आली आहे. 

  • जयपूर–बांद्रा टर्मिनस (वापीपर्यंतच धावेल)
  • बांद्रा टर्मिनस–जयपूर (वापीहून सुटेल)
  • भुसावळ–दादर (भिलाडपर्यंतच धावेल)
  • दादर–पोरबंदर (भिलाडहून सुटेल)
  • विरार–डहाणू रोड (वाणगावपर्यंत)
  • डहाणू रोड–चर्चगेट (वाणगावहून सुटेल)
  • विरार–डहाणू रोड (बोईसर/बोरपर्यंत)
  • डहाणू रोड–चर्चगेट (बोरहून सुटेल)

वेळ बदलेल्या गाड्या

  • मुंबई सेंट्रल–अहमदाबाद (सकाळी 5.40 वाजता ऐवजी 6.40 वाजता)
  • बांद्रा टर्मिनस–रामनगर (सकाळी 5.10 वाजता ऐवजी 6.30 वाजता)
  • मुंबई सेंट्रल–गांधीनगर कॅपिटल (सकाळी 6 वाजता ऐवजी 7 वाजता)
  • मुंबई सेंट्रल–अहमदाबाद (सकाळी 6.20 वाजता ऐवजी 7.30 वाजता)

(नक्की वाचा-  Palghar School Holiday: पालघरमध्ये जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश)

वळवण्यात आलेल्या गाड्या

  • चंदीगड–तिरुवनंतपुरम (सुरत–पालधी–जळगाव मार्गे)
  • हापा–मडगाव (सुरत–पालधी–जळगाव मार्गे)
  • अजमेर–सुरत (सुरत–पालधी–जळगाव मार्गे)
संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com