Palghar News: वडघर येथे पूल कोसळला, दोन वाहने पुलाखाली पडली, अपघाताचा व्हिडीओ पाहून थरकापच उडेल

वसई पूर्व भागातील वडघर गावाकडे जाणारा पूल कोसळल्याने पूलाखाली दोन वाहने पडल्याची घटना घडलीय. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Palghar Vadhar Bridge Accident Video

Palghatr Vadghar Bridge Collapsed : वसई पूर्व भागातील वडघर गावाकडे जाणारा पूल कोसळल्याने पूलाखाली दोन वाहने पडल्याची घटना घडलीय. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.मात्र,या मार्गावरील पुलांची क्षमता नसतानाही 40 ते 50 अवजड वाहने जात असल्याने हा पूल कोसळल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.मात्र हा पूल कोसळल्याने वडघर,काळभोन,लेंडी या गावांचा मार्ग तुटला आहे.ही घटना शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. पूलाखाली पडलेला ट्रक आणि कार क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरु असल्याची माहिती आहे.

गावकऱ्यांनी गौण खनिज वाहतुकीबाबत तक्रारी केल्या, पण..

मेढे ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या मेढे येथून वडघर,कळभोण,लेंडी व या परिसरात असलेले पाडे या ठिकाणी जाणाऱ्या मार्गावर हा पूल आहे.या पूलावरून या परिसरात असलेल्या गौण खाणीतून रोज शेकडो अवजड वाहने क्षमतेपेक्षा जास्त गौण खनिज भरून वाहतूक करत असल्याने या मार्गाची दुरावस्था झाली.

Advertisement

नक्की वाचा >> Dombivli News: डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरण!रमेश म्हात्रेंसह त्यांच्या तीन कार्यकर्त्यांना मोठा दणका,जामीन रद्द

इथे पाहा अपघाताचा थरारक व्हिडीओ 

अवजड वाहनांमुळे पूल कोसळल्याने या गावकऱ्यांचा रहदारीचा मार्ग बंद झाला आहे.अनेकदा गावकऱ्यांनी गौण खनिज वाहतुकीबाबत तक्रारी केल्या.प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने अवजड वाहतूकीचा फटका या पूलाला बसला.या मार्गावर रोज होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे हा पूल पडला असून  गावातील गावकऱ्यांचा येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.