Panvel Mahaplaika: पनवेल महापालिकेत निवडणुकीआधीच निकाल; भाजपचा पहिला नगरसेवक विजयी

नितीन पाटील यांच्या बिनविरोध निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि समर्थकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

Panvel Election News: पनवेल महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत भाजपाला मोठे यश मिळाले आहे. प्रभाग क्रमांक 18 (ब) मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितीन पाटील यांची बिनविरोध नगरसेवकपदी निवड झाली आहे.

या प्रभागातून शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराने दाखल केलेला उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान बाद ठरवण्यात आला. त्यामुळे निवडणूक रिंगणात एकमेव उमेदवार उरलेल्या नितीन पाटील यांची बिनविरोध निवड अधिकृतपणे घोषित करण्यात आली.

(नक्की वाचा- Navi Mumbai: AB फॉर्म मिळाले, सगळी तयारीही केली, मात्र अखेरच्या क्षणी ट्विस्ट; भाजपच्या 13 उमेदवारांची फसवणूक?)

नितीन पाटील यांच्या बिनविरोध निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि समर्थकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या निवडीमुळे पनवेल महानगरपालिकेत भाजपाची ताकद आणखी वाढली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

(नक्की वाचा-  BMC ELection 2026 Shivsena UBT Candidate List: शिवसेना (उबाठा)चे 113 उमेदवार ठरले, पाहा संपूर्ण यादी)

नव्या नगरसेवक म्हणून नितीन पाटील यांनी प्रभागातील विकासकामांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले असून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

Topics mentioned in this article