गर्लफ्रेंडचा फोटो बघताच बापाची सटकली, आई ढसाढसा रडू लागली अन्..एका परफ्युममुळे मुलाचं घाणेरडं कांड आलं समोर!

Shocking Viral Love Story : सोशल मीडियावर प्रेमप्रकरणासंबंधीत अनेक प्रकरणं व्हायरल होत असतात. काही लव्ह स्टोरी रोमॅन्टिक असतात. तर काही स्टोरींमध्ये खतरनाक सस्पेन्स असतो. पण इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका लव्ह स्टोरीनं खळबळ उडवली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Shocking Viral News
मुंबई:

Shocking Viral Love Story : सोशल मीडियावर प्रेमप्रकरणासंबंधीत अनेक प्रकरणं व्हायरल होत असतात. काही लव्ह स्टोरी रोमॅन्टिक असतात. तर काही स्टोरींमध्ये खतरनाक सस्पेन्स असतो. पण इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका लव्ह स्टोरीनं खळबळ उडवली आहे. यामध्ये सीए परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासोबत धक्कादायक प्रकार घडलाय. त्याने केलेला सीक्रेट डांडिया डेट ही सर्वात मोठी चूक सिद्ध झाली आहे. त्याला वाटलं होतं की, घरच्या माणसांना कळणार नाही. पण एका परफ्युमने त्याच्या सर्व प्लानिंगवर पाणी फेरलं.

खोटं बोलून गर्लफ्रेंडसोबत दांडिया नाईटला गेला अन्..

रेडिटवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये मुलाने म्हटलंय की, तो त्याच्या सीए फायनल आणि CFA च्या स्टडीमध्ये व्यस्त होता. याचदरम्यान त्याला एक लोकल इव्हेंटचा दांडीया नाईटचा पास मिळाला. त्याने त्याच्या 21 वर्षांच्या गर्लफ्रेंडसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मित्रांसोबत जात आहे, असं त्याने घरच्यांना सांगितलं. पण खरंतर ही त्याची सीक्रेट डेट होती.रात्रभर डान्स, मस्ती, हसणं-खेळणं आणि खूप साऱ्या आठवणी..सर्वकाही परफेक्ट सुरु होतं.पण नशिबाला कदाचित दुसरं काही मंजूर होतं.

नक्की वाचा >> बाळ कोणाचं? लव्ह ट्रँगलचा सर्वात भयंकर शेवट, एक्स BF ने गर्भवतीचा खून केला..पतीनेही आरोपीला जागेवरच संपवलं अन्

परफ्यूमने खोट्या गोष्टीचा झाला पर्दाफाश

रात्री जवळपास साडेदहा वाजता तो घरी परतला. तेव्हा मुलाच्या आईला त्याच्या कपड्यांमधून लेडिज परफ्युमचा सुगंध आला. त्याच्या आईला संशय आल्यानंतर तिने मित्रांना कॉल केला आणि सत्य समोर आलं. मित्रांना काहीच माहित नव्हतं. त्यानंतर मुलाची आई रडायला लागली. बहिणीनेही सांगितलं की, भाऊ काही दिवसांपूर्वी एखाद्या मुलीसोबत बोलत होता आणि त्यानंतर घरात सुरु झाला रिअल ड्रामा..

Advertisement

वडिलांनी थप्पड मारली अन् आईला रडत रडत फोन खेचला

मुलाने पोस्टमध्ये पुढं म्हटलंय, आईने त्याच्या फोन खेचला आणि त्यात असलेले फोटो पाहिले. त्यानंतर आई जोराजोरात रडू लागली. पप्पाने मला थप्पड मारली.घरातील सर्व माझ्यावर भडकले. त्यांनी माझ्या गर्लफ्रेंडचा नंबर मागितला. पण मी तो नंबर द्यायला नकार दिला. मुलाने पुढं लिहिलं, मला खूप अपमानित वाटलं. मी निश्चय केला आहे की, जेव्हा मी पैसे कमवणे सुरु करेल, तेव्हा आई-वडिलांच्या सोबत येणार नाही.

नक्की वाचा >> आधी केस मोकळे सोडले अन् नंतर झिंज्या उडवल्या, या हँडसमसोबत श्वेता तिवारी थिरकली, दिवाळी पार्टीचा Video व्हायरल