जाहिरात

आधी केस मोकळे सोडले अन् नंतर झिंज्या उडवल्या, या हँडसमसोबत श्वेता तिवारी थिरकली, दिवाळी पार्टीचा Video व्हायरल

Shweta Tiwari Diwali Party Celebration Video : प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुरु असते. सुंदर आणि बोल्ड आऊटफिट्स घालून श्वेता नेहमीच फोटो शूट करते. पण आता श्वेताचा नवा डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय.

आधी केस मोकळे सोडले अन् नंतर झिंज्या उडवल्या, या हँडसमसोबत श्वेता तिवारी थिरकली, दिवाळी पार्टीचा Video व्हायरल
Shweta Tiwari Dance Video Viral
मुंबई:

Shweta Tiwari Diwali Party Celebration Video : प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुरु असते. सुंदर आणि बोल्ड आऊटफिट्स घालून श्वेता नेहमीच फोटो शूट करते आणि इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करते. श्वेताच्या अदा पाहण्यासाठी चाहत्यांची सोशल मीडियावर तुफान गर्दी जमते. अशातच श्वेता तिची मुलगी पलक तिवारीसोबत एका मित्राच्या घरी आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीत सहभागी झाली होती.

कसौटी जिंदगी फेम इन्स्टा श्वेताने इन्स्टाग्रामवर अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या व्हिडीओत पाहू शकता की, गोल्डन ब्लॅक साडीत श्वेताचं सौंदर्य खुललं आहे. श्वेताने दिवाळी सेलिब्रेशनचे सुंदर क्षण पोस्टमध्ये शेअर केले आहेत. फोटो आणि व्हिडीओ शेअर करत श्वेताने कॅप्शनमध्ये म्हटलंय, फटाक्यांपेक्षाही जास्त वेगवान वाईब्स..

व्हिडीओत दिसतंय की, श्वेता तिवारी अभिनेता विकास कलंत्रीसोबत डान्स करते. त्याचदरम्यान ती वरुण कस्तुरियासोबत पोज देते आणि त्याच्यासोबत खूप मस्ती करते. तिने तिच्या मित्रांसोबत पाणीपुरी पार्टीही एन्जॉय केली. एका व्हिडीओत पाहू शकता की, श्वेताने मित्रांसोबत कराओके सेशनही एन्जॉय केलं. 

नक्की वाचा >> Video : ऑस्ट्रेलियाच्या युवा खेळाडूची विराटवर होती करडी नजर..हवेत उडी मारून घेतला आतापर्यंतचा सर्वात बेस्ट कॅच

इथे पाहा श्वेता तिवारीचा व्हायरल व्हिडीओ

श्वेता तिवारीसोबत पोज देणारा तो व्यक्ती कोण?

टीव्ही फेम श्वेता तिवारीसोबत एका फोटोत वरुण कस्तुरियानेही पोज दिली आहे. दोघांचीही केमिस्ट्री जबरदस्त आहे. दोघेही जबरदस्त लुकमध्ये दिसत आहेत. वरण कस्तुरिया आणि श्वेता तिवारीने एकत्रित काम सुद्धा केलं आहे. ऑनस्क्रीन श्वेता तिवारीने वरुण कस्तुरियाच्या आईचाही रोल प्ले केला होता. वरुण तिवारीने श्वेतासोबतचे खास क्षणही शेअर केले आहेत. 

नक्की वाचा >> Viral Photo : थांबा जरा..तुम्हीही GPS चा वापर करून वाहन चालवताय? Google मॅपने चालकाला दाखवला सर्वात खतरनाक रस्ता

Listen to the latest songs, only on JioSaavn.com