जाहिरात

बाळ कोणाचं? लव्ह ट्रँगलचा सर्वात भयंकर शेवट, एक्स BF ने गर्भवतीचा खून केला..पतीनेही आरोपीला जागेवरच संपवलं अन्

Live In Relationship Murder Case :  एका गर्भवती महिलेवर एक्स बॉयफ्रेंडने चाकूने हल्ला करत तिची निर्घृण हत्या केली. महिलेची हत्या केल्यावर आरोपीने महिलेच्या पतीवरही चाकूने वार केले.

बाळ कोणाचं? लव्ह ट्रँगलचा सर्वात भयंकर शेवट, एक्स BF ने गर्भवतीचा खून केला..पतीनेही आरोपीला जागेवरच संपवलं अन्
Shocking Murder Case
मुंबई:

Live In Relationship Murder Case :  एका गर्भवती महिलेवर एक्स बॉयफ्रेंडने चाकूने हल्ला करत तिची निर्घृण हत्या केली. महिलेची हत्या केल्यावर आरोपीने महिलेच्या पतीवरही चाकूने वार केले. पण महिलेच्या पतीनं कसंतरी आरोपीच्या हातातला चाकू हिसकावून घेतला आणि त्याच्यावर प्रतिहल्ला चढवला. या हल्ल्यात आरोपीचाही मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना दिल्लीच्या नबी करीब परिसरात घडल्याचं समजते. शालिनी आणि आशु अशी हत्या झालेल्या व्यक्तींची नाव असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.शालिनी दोन मुलांची आई होती, अशी माहितीही पोलीस तपासात उघड झाली आहे. 

मध्य दिल्लीचे डीसीपी निधिन वलसन यांनी या हत्याप्रकरणाबाबत म्हटलंय की, ही घटना शनिवारी रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास घडली. जेव्हा आकाश आणि शालिनी कुतुब रोडवर शालिनीची आई शीलाला भेटायला जात होते.याचदरम्यान, आशू अचानक तिथे पोहोचला आणि त्याने आकाशवर चाकूने वार केले. आमची टीम याप्रकरणाची सर्व बाजूने चौकशी करत आहे.घटनेत शालिनीचा पती आकाशही जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. 

चाकूने अनेकदा केला हल्ला

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार,शनिवारी उशिरा रात्री तिघांमध्ये एखाद्या गोष्टीवर बाचाबाची झाली. वाद इतका वाढला की, आशुने रागाच्या भरात चाकूने शालिनीवर हल्ला केला.शालिनी तिथेच खाली पडली. त्यानंतर आशुने पलटवार केला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले,तेव्हा तिघेही रक्तबंबाळ झाले होते. त्यानंतर तिघांनाही रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी शालिनी आणि आशुला मृत घोषित केलं. आकाशची प्रकृती गंभीर आहे आणि त्याच्यावर उपचार सुरु आहेत. 

नक्की वाचा >> पुणे हादरलं! महिलेला बाईकवर लिफ्ट दिली..नंतर झुडपात नेऊन अत्याचार केला, पोलिसांनी 100 हून अधिक CCTV तपासले अन्

हत्येमागे खळबळजनक कारण

घटनेपूर्वी शालिनी गर्भवती होती. आशूला संशय होता की, शालिनीच्या पोटात त्याचं बाळ आहे. पण शालिनी म्हणत होती की, तो आकाशचा मुलगा आहे. याच कारणामुळे रात्रीत त्यांच्यात मोठा वाद झाला. वाद चिघळल्यानंतर आशुने रागाच्या भरात शालिनी आणि आकाशवर हल्ला केला. दरम्यान, नबी करीमच्या राम नगर परिसरात ही घटना घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.आजूबाजूच्या लोकांचं म्हणणं आहे की, त्यांनी आधीही तिघांच्या वादाबाबत ऐकलं होतं. पण कोणालाच माहित नव्हतं की हा वाद इतका पेटेल. विजय कुमार याने म्हटलं की, ही घटना समाजासाठी एक मोठा धडा आहे. 

नक्की वाचा >> ‘बदलापूर शहरात 17000 बाहेरचे मतदार..मतदानाला आल्यावर चोपून काढणार', शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रेंचा इशारा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com