Passenger dies : उचकी आली अन् जीव सोडला, एक्सप्रेसमध्ये प्रवाशाचा मृत्यू; मुंबईहून घरी जाताना नेमकं काय घडलं? 

खूप दिवसांनी नवरा घरी येणार असल्याने पत्नी आनंद होती. मुलंही मुंबईत काम करणाऱ्या आपल्या वडिलांची वाट पाहत होते, मात्र प्रत्यक्षात त्यांचा मृतदेह पाहून कुटुंब हादरलं!

जाहिरात
Read Time: 2 mins

Passenger dies in express train : मुंबईतील एका कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीचा आपल्या घरी जाण्यापूर्वी मृत्यू झाला. त्यांना गावी जाण्याचा आनंद होता. ते घाईघाईत एक्सप्रेसमध्ये बसले. मात्र हा त्यांचा शेवटचा प्रवास ठरला. प्रवासादरम्यान त्यांना ४-५ वेळा उचकी आली आणि कुणाला काही कळायच्या आत त्यांचा मृत्यू झाला. 

प्रवाशासोबत नेमकं काय घडलं? 

मुंबईतील एका कंपनीत लेबर इन्चार्ज निषाद आपल्या घरी उत्तर प्रदेशात निघाले होते. ते मुंबईतील स्मार्ट सिटी कंपनीत काम करीत होते. कुटुंबाला भेटायला मिळणार म्हणून ते खूप खूश होते. सध्या शेतीचं काम असल्याने ते आपल्या दोन सहकाऱ्यांसह कुशीनगर एक्सप्रेसने बस्तीला निघाले होते. ट्रेन झांसी स्टेशनला पोहोचण्यापूर्वी फुलचंद यांना अचानक उचकी आली. त्यांना अशा अवस्थेत पाहून सहकारी घाबरले. तातडीने त्यांना रेल्वेच्या सीटवरच झोपवण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यापूर्वी एक्सप्रेसच्या डब्यात त्यांचा मृत्यू झाला. काही वेळात झांशी स्टेशन आलं. येथे जीआरपी, आरपीएफ आणि डॉक्टर रेल्वे प्लॅटफॉर्मवर पोहोचले. येथे तपासणीदरम्यान डॉक्टरांनी फुलचंद यांना मृत घोषित केलं, आज तकने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

नक्की वाचा - Vasai News : मामाकडे राहायला आली अन् विपरित घडलं; शेवटी लोकलमध्येच मामाने केला बहिणीचा घात

उचकी की हृदयविकाराचा झटका?

प्रवाशांच्या तक्रारीनंतर मृतदेह डब्यातून खाली उतरवण्यात आला. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला आणि पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला.पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर नेमकं कारण स्पष्ट होईल, असं सांगितलं जात आहे. उचकीमुळे की, हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला, याची माहिती शवविच्छेदनाच्या रिपोर्टनंतर समोर येईल. 

Advertisement


 

Topics mentioned in this article