मनोज सातवी
Vasai News : वसईत थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. सख्या भाचीच्या प्रेमात पडलेल्या मामाने, लग्नाच्या तगाद्याला कंटाळून भाचीची चालत्या ट्रेनमधून ढकलून हत्या केली आहे. वालीव पोलिसांनी आरोपी मामाला अटक केली असून कोर्टाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मृत मुलगी (१६ वर्षे) ही मूळची मुंबईच्या मानखुर्द येथे राहणारी आहे. तर, तिचा मामा (२८ वर्षे) हा वसईतील एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मामासाठी भाचीने घर सोडलं
मामाशी लग्न करण्यासाठी तिने शनिवारी घर सोडलं आणि वालीव गावराई पाडामधील (ओमसाई चाळीत) आपल्या मामाकडे राहण्यास आली होती. त्यानंतर ती मामाच्या घरूनही न सांगता कुठेतरी निघून गेली होती. त्यामुळे तिच्या आईने वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
नक्की वाचा - EX Girlfriend ला किस करणं पडलं महागात; गावकऱ्यांनी तरुणाच्या शरीराचे अवयव गोळा करून रुग्णालयात पोहोचवलं
मामाने लोकलमधून ढकलून दिलं...
दरम्यान सोमवारी तिचा मामा अर्जुन सोनी तिला भाईंदरवरून नालासोपारा येथे लोकलने घेऊन निघाला होता. पण, लोकल नायगाव भाईंदर दरम्यान पोहचताच अर्जुन याने भाचीला चालत्या लोकलमधून ढकलून दिले. यात लोकलमधून पडून तिचा मृत्यू झाला आहे. यावेळी ट्रेनमधील नंदू झा या प्रवाशाने ही घटना प्रत्यक्ष पाहिली. तिच्या मामाने तिला धक्का दिल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे ट्रेनमधील इतर प्रवाशांनी या नराधम मामाला (अर्जुन सोनी ) वसई रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिसांच्या तपासात हा धक्कादायक आणि नात्याला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
