Kalyan News: पेट्रोल पंपावर ग्राहकांना वाटले मेलोडी चॉकलेट, या पक्षाच्या आंदोलनाची राजकीय वर्तुळात तुफान चर्चा

वाढत्या महागाई आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कल्याण युवक काँग्रेसने रविवारी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत पेट्रोल पंपावर इंधन भरणाऱ्या ग्राहकांना मेलोडी चॉकलेट वाटप केले.

जाहिरात
Read Time: 2 mins
Kalyan Congress Latest News

Kalyan Political News Today : वाढत्या महागाई आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कल्याण युवक काँग्रेसने रविवारी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत पेट्रोल पंपावर इंधन भरणाऱ्या ग्राहकांना मेलोडी चॉकलेट वाटप केले.केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशात महागाई वाढत असताना मोदी सरकार मात्र गप्प आहे,असा आरोप केला.विदेश दौऱ्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध नेत्यांना मेलोडी चॉकलेट देतात,मात्र देशातील सर्वसामान्य नागरिक महागाईमुळे त्रस्त आहेत,असं आंदोनकर्त्यांचं म्हणणं आहे.

इंधन दरवाढ कमी करून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा

पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना मेलोडी चॉकलेट देत युवक काँग्रेसने केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली.आज पेट्रोल भरताना सामान्य माणूस आधी आपल्या बँक खात्यात किती पैसे आहेत हे पाहतो. इंधन दरवाढ कमी करून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा,अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. तसेच मोदी सरकार वर्क फ्रॉम होम करण्याचा सल्ला देते.पण पेट्रोल भरून रोज काम करणारा सामान्य कामगार,शेतकरी किंवा मजूर वर्क फ्रॉम होम कसा करणार?असा सवालही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.

Advertisement

नक्की वाचा >> Palghar News : 16 वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणातील फरार आरोपीचा खळबळजनक व्हिडीओ आला समोर, पोलिसही अडचणीत

वाढत्या खर्चामुळे सर्वसामान्यांवर मोठं संकट

कल्याण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जपजीत सिंग माटा यांनी सांगितले की, 2014 पासून महागाई,बेरोजगारी आणि वाढत्या खर्चामुळे सर्वसामान्यांचे जीवन कठीण झाले आहे. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आम्ही हे मेलोडी चॉकलेट आंदोलन करत निषेध नोंदवत आहोत. या आंदोलनाची शहरात मोठी चर्चा रंगली असून युवक काँग्रेसच्या या अनोख्या आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

नक्की वाचा >> Konkan News: 'या' तारखेपासून कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ होणार बंद, कधी होणार सुरु?