जाहिरात

Palghar News : 16 वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणातील फरार आरोपीचा खळबळजनक व्हिडीओ आला समोर, पोलिसही अडचणीत

वसईत 16 वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणातील फरार आरोपी अविनाश उर्फ विनय उर्फ विनोद सोनी याचा धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

Palghar News : 16 वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणातील फरार आरोपीचा खळबळजनक व्हिडीओ आला समोर, पोलिसही अडचणीत
Accused Viral Video

Palghar Crime News : वसईत 16 वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणातील फरार आरोपी अविनाश उर्फ विनय उर्फ विनोद सोनी याचा धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.पोलिसांच्या तावडीतून पसार झाल्यानंतर आरोपी सोसायटीच्या लिफ्टमधून जाताना आणि आनंद व्यक्त करत हातवारे करत असल्याचं समोर आलं आहे. आरोपीला आनंदाच्या उकळ्या फुटत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

'गुगल पे'च्या माध्यमातून 45 हजार रुपयांची लाच घेतली

आरोपी विनोद सोनीला 18 मे रोजी वसई न्यायालयात हजर केले. त्यानंतर आरोपीला पळून जाण्यास तीन पोलिसांनी मदत केली, असा आरोप आहे.यासाठी संबंधीत पोलिसांनी वेळोवेळी 'गुगल पे'च्या माध्यमातून 45 हजार रुपये लाच घेतली,अशीही धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे.

नक्की वाचा >> Konkan News: 'या' तारखेपासून कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ होणार बंद, कधी होणार सुरु?

इथे पाहा त्या आरोपीचा व्हायरल व्हिडीओ

याचदरम्यान,आरोपीने पोलिसांना चकवा देत पलायन केले.या प्रकरणी तीन पोलीस कर्मचारी,आरोपीची पत्नी आणि मुलगा अशा पाच जणांना अटक करण्यात आली.न्यायालयाने त्यांना 26 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान,18 मे पासून फरार असलेल्या आरोपीचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आल्यानंतर मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

नक्की वाचा >> Pandharpur News: विठ्ठलाचं आषाढ महिन्यात VIP दर्शन बंद राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com