Big News: "कांद्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर मकोका लागणार, इन कॅमेरा..", भाजप मंत्र्याचा मोठा इशारा

"कांद्याला कमीत कमी 1585 रुपये भाव निश्चित केला असून काळाबाजार रोखण्यासाठी खरेदी केंद्रावर इन कॅमेरा कांदा खरेदी करण्यात येणार आहे".

जाहिरात
Read Time: 2 mins
Jaykumar Rawal On Onion Black Marketing

नागिंद मोरे, प्रतिनिधी

Jaykumar Rawal On Onion Black Market : "कांद्याला कमीत कमी 1585 रुपये भाव निश्चित केला असून काळाबाजार रोखण्यासाठी खरेदी केंद्रावर इन कॅमेरा कांदा खरेदी करण्यात येणार आहे.कांद्याचा काळाबाजार होऊ नये या साठी नाशिकचे पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना कडक लक्ष देण्याचे सुचना दिल्या असून खरेदी केंद्रावर कांदाचा काळाबाजार करणाऱ्यांवर मोकोका सारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे", असा इशारा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिला आहे.

"आज शिरपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात मंत्री जयकुमार रावल म्हणाले,"कांदा संदर्भात मुख्यमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे केंद्रातील मंत्रीसोबत बैठक संपन्न झाली.कांदा पूर्वी फक्त महाराष्ट्रातच मोठ्या प्रमाणात पिकवला जात होता. आता मात्र अनेक राज्य कांदा पिक घेत आहेत.बांगलादेश आणि श्रीलंका येथे आपला कांदा जायचा. मात्र तिथे देखील कांदा पिक घ्यायला लागले.त्यामुळे कांद्याचे बियाणे कुठे जाऊ नये, यावर एक्सपोर्ट बॅन लागावं यासाठी कांद्याला एक्सपोर्ट केलं तर ज्या मध्ये सबसिडी मिळणार होती, ती आपण आता दुप्पट करण्यासाठी केंद्राने मान्य केले",असंही रावल म्हणाले.

नक्की वाचा >> Inspirational Story: 'या' बसस्थानकाने महाराष्ट्रात पटकावला प्रथम क्रमांक, 1 कोटींचं बक्षिसही जिंकलं

"...म्हणून कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढणार"

"2 लाख टन कांदा खरेदी ही कृषी उत्पन्न बाजार समितीने करावी की थेट शेतकऱ्यांमधून खरेदी करावी, असा निर्णय झाला कसून पणन मंत्री या नात्याने नाफेड अणि एन सीसीएफ मार्फत जी खरेदी होईल. त्याचा शेष मार्केट कमिटी माफ करेल असा निर्णय घेतला.कांदा खरेदी होत असतांना काळाबाजार हौऊ नये यासाठी नाशिकचे पोलिस अधीक्षक,जिल्हाधिकारी यांना कडक लक्ष ठेवण्याच्या सुचेना दिले आहेत.जिल्हा खरेदी केंद्र आहेत तिथे बारकाईने इन कॅमेरा खरेदी होईल ,शेतकऱ्यांकडून 1585 रुपये हा कमीत कमी भाव घेतलेला आहे. म्हणून कांद्याचे दर हे मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. काही काळाबाजार करणारे लोक आहेत जे दर वाढू नये यासाठी अडथळा निर्माण करत आहेत.त्यांच्यावर मोकोका सारखा कायदा लावू",असा इशारा यावेळी मंत्री जयकुमार रावल यांनी दिला आहे.

नक्की वाचा >> IPL 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीचा प्रवास संपला! आता 'बेबी बॉस' कधी आणि केव्हा खेळणार सामने? वाचा संपूर्ण शेड्युल