
What diseases are caused by pigeon droppings : कबुतरांच्या मुद्द्यावरुन सध्या मुंबईत रणकंदन उठलं आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महानगरपालिकेने मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मुंबईतील कबुतरखान्यांवर ताडपत्री टाकून बंदी घालण्यात आली. मात्र जैन समाज यावरुन आक्रमक झाला आहे. त्यामुळे कबुतरांच्या मुद्द्यावरुन सध्या महाराष्ट्रात दोन गट झाल्याचं पाहायला मिळत आहे.
वैद्यकीयदृष्ट्या कबुतरांची पिसं आणि त्यांच्या विष्ठा माणसांच्या आरोग्यासाठी घातक असल्याचं अनेक अहवालातून समोर आलं आहे. याबाबत NDTV मराठीने मुंबईतील झायनोवा शाल्बी रुग्णालयाचे डॉक्टर निमित्त नागडा यांच्याशी बातचित केली. आणि कबुतरांमुळे नेमका काय त्रास होतो किंवा कोणत्या आजारांचा धोका होतो याबाबत जाणून घेतलं.
नक्की वाचा - Dadar kabutar Khana News: कबुतरखान्यावरुन दादरमध्ये राडा! जैन समाज आक्रमक, ताडपत्री हटवली, तोडफोड केली
कबुतरांच्या विष्ठेमुळे कोणते आजार होतात?
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुख्यत्वे फुप्फुसांवर परिणाम होतो. या फंगसमुळे अनेक आजार उद्भवू शकतात. यामध्ये हिस्टोप्लाज्मोसीस (या आजारात फुप्फुस, श्वसनाचे गंभीर विकार होतात, यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते), सिटोकोसीस (ताप येतो, फ्लूसारखी लक्षणं), क्रिप्टोकोकोसिस (फुप्फुस तसेच गंभीर प्रकरणांमध्ये मेंदू आणि मणक्याचे आजार होऊ शकतात) हे बुरशीजन्य आजार होतात. जिवाणुच्या संसर्गामुळे होणारे आजार म्हणजे साल्मोनेलोसिस (या आजारातअतिसार, उलट्या आणि ताप हा त्रास जाणवतो), कॅम्पिलोबॅक्टरिओसिस.
कबुतरांच्या विष्ठेमध्ये जे जे घटक असतात त्यामुळे आपलं शरीर, फुप्फुस अॅलर्जिक रिअॅक्शन देतं. त्या आजाराचं नाव आहे हायपरसेन्सिटीव्हिटी न्यूमोनायटीस. हा खूप त्रासदायक आजार असून दीर्घ काळ चालणारा आजार आहे. या आजारांपासून लांब राहण्याचं असले तर कबुतरं आणि त्यांच्या विष्ठेपासून लांब राहणं आवश्यक आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world