
Dadar Kabutar Khana Jain Community Protest: दादरमधील कबुतरखाना हटवण्यावरुन मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे. जैन समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज अचानक जैन बांधवांनी दादरमधील कबुतरखान्याच्या ठिकाणी गर्दी केली. यावेळी संतप्त जमावाने कबुतरखान्यावर झाकलेली ताडपत्री हटवली आहे. जैन समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये कबुतरखान्यांवरुन मोठा वाद सुरु आहे. हायकोर्टाच्या निर्णयानंतर दादरमधील कबुतरखान्यावर महापालिकेने कारवाई केली होती. पालिकेने याठिकाणी ताडपत्री झाकत हा कबुतरखाना बंद केला होता तसेच त्यांना खाद्य घालण्यासही बंदी करण्यात आली होती.
Dadar Kabutarkhana Controversy: दादर कबुतरखाना पुन्हा सुरू होणार, कबुतरांना खायला घालता येणार
या कारवाईनंतर जैन समाज नाराज झाला होता. आज सकाळी जैन बांधवांनी याठिकाणी गर्दी केली. यावेळी आक्रमक झालेल्या जमावाने कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवली तसेच तोडफोडही केली. महिला, तरुणांचा यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. अचानक झालेल्या या राड्याने पोलिसांचीही धावपळ झाली. पोलिसांनी आक्रमक झालेल्या आंदोलकांची धरपकड सुरु केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world