Ajit Pawar Death: ट्रॅफिकमुळे 'तो' निर्णय घ्यावा लागला अन् होत्याचं नव्हतं झालं, त्या दिवशी काय घडलं?

अजित पवार यांचे पायलट सुमित कपूर यांच्यावर विमान उड्डाणाची जबाबदारी नव्हती. त्या दिवशी नेमकं काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी..

जाहिरात
Read Time: 2 mins
Ajit Pawar Plane Crash Recent Update
मुंबई:

Ajit Pawar Plane Crash :   बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पायलट सुमित कपूर यांचाही दुर्देवी मृत्यू झाला.आज लाखो लोकांच्या उपस्थित अजितदादांवर शासकीय इतममात अंत्यसंस्कार पार पडले. दुसरीकडे, कॅप्टन सुमित यांच्या कुटुंबीयांचा आणि मित्रांचाही आक्रोश ओसंडून वाहत आहे.अशातच या घटनेबाबत नवी अपडेट समोर आली आहे. विमानाच्या उड्डाणाची जबाबदारी दुसऱ्या पायलटला देण्यात येणार होती. परंतु, तो पायलट ट्रॅफिक जॅममध्ये अकडला आणि सुमितला तत्काळ विमान ऑपरेट करण्यासाठी बोलावण्यात आलं.

कॅप्टन सुमित यांच्या मित्रांनी दिलेली माहिती अशी की, सुमित यांना अजित पवारांचं विमान ऑपरेट करण्याचा आदेश अचानक मिळालं होता. खरंतर या विमानाच्या उड्डाणासाठी दुसऱ्या पायलटला सांगण्यात आलं होतं. पण तो ट्रॅफिकमध्ये अडकला होता. त्यामुळे सुमित यांना तातडीनं बोलावून विमान उडवण्याची जबाबदारी देण्यात आली.सुमित कपूर हे अत्यंत चांगल्या स्वभावाचे होते.ते नम्र आणि कर्तव्यनिष्ठ होते. काही दिवसांपूर्वीच ते हाँगकाँगहून परतले होते. 

नक्की वाचा >> Ajit Pawar Death : राज्याचा पुढील अर्थसंकल्प कोण सादर करणार? 'या' 3 नेत्यांची होतेय चर्चा

सुमित यांचा मुलगा आणि जावई दोघेही पायलट

बारामतीतील विमान अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला असावा आणि याची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे.सुमितला विमान उडवण्याचा खूप मोठा अनुभव होता आणि त्यांच्याकडून चूक होण्याची शक्यता कमीच होती. सुमित कपूर यांचा एक भाऊ गुरुग्राममध्ये उद्योजक आहे. मुलगा आणि मुलगी दोघांचंही लग्नं झालं आहे. विशेष म्हणजे सुमित यांचा मुलगा आणि जावई दोघेही पायलट आहेत, असंही सुमित यांच्या मित्रांनी म्हटलं आहे. 

सुमित यांच्या मृतदेहाची ओळख कशी पटली?

सुमित कपूर यांचे मित्र सचिन तनेजा यांनी सांगितलं की त्यांना विमान उडवण्याची खूप आवड होती. त्यांचे मित्र नरेश म्हणाले, घटनेची बातमी कळल्यानंतर कोणीलाही विश्वास बसत नव्हता की,सुमितचा मृत्यू झाला आहे. मित्र जी.एस. ग्रोव्हर यांनी सांगितले की, हाँगकाँगवरून परतल्यानंतर त्यांची सुमितसोबत बरीच चर्चा झाली होती. त्यांनी सुमितला आरोग्याची अधिक काळजी घ्यायला सांगितले होते.अपघातानंतर सुमितच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या हातात असलेल्या कड्यामुळे करण्यात आली.

Advertisement

नक्की वाचा >> समृद्धी महामार्गावर काँग्रेस नगरसेवकांच्या अपहरणाचा प्रयत्न, तोंडाला रुमाल बांधून टोळी आली अन्..पाहा video

अजित पवारांच्या विमानाची कमान कॅप्टन सुमित कपूर यांच्याच हाती होती.ते VSR Ventures Private Limited या कंपनीशी जोडलेले होते आणि त्यांना 16,500 तासांपेक्षा अधिक उड्डाणाचा अनुभव होता.कॅप्टन सुमित कपूर अनेक वर्षांपासून एव्हिएशन क्षेत्रात सक्रिय होते आणि त्यांनी हाय-प्रोफाइल प्रवाशांच्या अनेक फ्लाइट्सही ऑपरेट केल्या होत्या.