Pune News : पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीला मोठा धक्का, करिष्मा बारणेंसह या उमेदवारांचे AB फॉर्म रद्द, कारण काय?

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीला मोठा धक्का बसला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pimpari Chinchwad Municipal Corporation Election 2026
पुणे:

सूरज कसबे , प्रतिनिधी

Pimpari Chinchwad Election 2025 :  राज्यातील एकूण 29 महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं असून सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी आपापल्या वॉर्डात रणशिंग फुंकलं आहे. नववर्षात 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 जानेवारीला या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. अशातच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीला मोठा धक्का बसला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये भाजपच्या करिश्मा बारणे, शालिनी गुजर, गणेश गुजर, तर शिवसेना शिंदे गटाच्या निशा ताम्हाणे, रूपाली गुजर यांचा समावेश आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक 24 मधील भाजपचे 3 आणि शिवसेना शिंदे गटाच्या 2 उमेदवारांचे एबी फॉर्म रद्द झाले आहेत. या उमेदवारांचे 'एबी' फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननी दरम्यान बाद ठरवले आहेत. अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर हे फॉर्म जमा झाल्याचे कारण देत हा निर्णय घेण्यात आला आहे. याचा फटका पाचही उमेदवारांना बसला आहे. त्यामुळे या उमेदवारांना  'अपक्ष' म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागणार आहे. 

नक्की वाचा >> Thane News : पाण्याची आताच बचत करा, ठाण्यात या दिवशी संपूर्ण पाणी पुरवठा होणार ठप्प, ठिकाणे अन् वेळ जाणून घ्या

विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी आक्षेप नोंदवला

प्रभाग 24 मध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुदत संपल्यानंतर या 5 उमेदवारांचे 'एबी' फॉर्म निवडणूक कार्यालयात सादर करण्यात आले होते. या तांत्रिक बाबीवर विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी आक्षेप नोंदवला होता. आज झालेल्या अर्जांच्या छाननी प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा आक्षेप ग्राह्य धरला आणि हे पाचही 'एबी' फॉर्म अवैध ठरवले. 

नक्की वाचा >> Funny Video: 7 फेरे आणि 4 बायका! स्टेजवरच करवल्यांनी केलं असं काही ..लग्नमंडपातील पाहुणे हसून हसून लोटपोट झाले

अर्ज बाद झालेले उमेदवार कोण?

 भाजप: करिश्मा बारणे, शालिनी गुजर, गणेश गुजर.

 शिवसेना (शिंदे गट): निशा ताम्हाणे, रूपाली गुजर

या निर्णयामुळे प्रभाग 24 मधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. आता या प्रभागात भाजपचा (कमळ चिन्ह) फक्त एकच उमेदवार रिंगणात असेल, तर शिंदे शिवसेनेचे दोन उमेदवार 'धनुष्यबाण' चिन्हावर निवडणूक लढवू शकणार नाहीत. अधिकृत पक्षाचे चिन्ह न मिळाल्याने या मातब्बर उमेदवारांना आता स्वतंत्र चिन्हावर आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे.

Advertisement