जाहिरात

Thane News : पाण्याची आताच बचत करा, ठाण्यात या दिवशी संपूर्ण पाणी पुरवठा होणार ठप्प, ठिकाणे अन् वेळ जाणून घ्या

ठाणे महापालिकेची निवडणूक तोंडावर असतानाच शहरातील पाणी पुरवठ्याबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

Thane News : पाण्याची आताच बचत करा, ठाण्यात या दिवशी संपूर्ण पाणी पुरवठा होणार ठप्प, ठिकाणे अन् वेळ जाणून घ्या
Thane Water Supply News
मुंबई:

Thane Water Supply News : ठाणे महापालिकेची निवडणूक तोंडावर असतानाच शहरातील पाणी पुरवठ्याबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ठाणे महापालिकेच्या घोडबंदर परिसरात पाणी पुरवठा करणारी हरिदास नगर येथील मुख्य जलवाहिनीवरील 700 मि.मी व्यास असलेल्या वॉल्व (valve) नादुरूस्त झाली आहे. त्यामुळे या परिसरातील पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. या वॉल्वची दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचं आहे. यासाठी शुक्रवारी 2 जानेवारी रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असणार आहे. या दिवशी ठाणे महानगरपालिका व स्टेम (STEM) प्राधिकरणाकडून होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. 

ठाण्यात कोणत्या भागात पाणीपुरवठा होणार ठप्प?

मिळालेल्या माहितीनुसार, नववर्षात म्हणजेच 2 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यत घोडबंदर  रोड,लोकमान्यनगर,वर्तकनगर,साकेत,ऋतूपार्क,जेल,गांधीनगर,सिध्दांचल, इंदिरानगर,रुपादेवी,श्रीनगर,समतानगर,सिध्देश्वर,इटरनिटी,जॉन्सन,मुंब्रा व कळव्याचा काही भागात 12 तासांसाठी पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. णी कपातीच्या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. 

नक्की वाचा >> Funny Video: 7 फेरे आणि 4 बायका! स्टेजवरच करवल्यांनी केलं असं काही ..लग्नमंडपातील पाहुणे हसून हसून लोटपोट झाले

ठाणे महागनरपालिकेची निवडणूक येत्या 15 जानेवारी 2026 ला पार पडणार आहे. तर 16 जानेवारीला या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली असतानाच ठाणे शहरातील पाणी पुरवठ्याच्या समस्येमुळं नागरिक त्रस्त झाले आहेत. पाणी टंचाईच्या समस्यांना नेहमीच सामोरं जावं लागत असल्याने येथील नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

नक्की वाचा >>  Viral Video: एका चुकीमुळे नवरा-नवरीचं लग्न थांबलं..Blinkit डिलिव्हरी बॉयने लाज राखली, 16 मिनिटांत जे घडलं..

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com