Wedding Viral Video : लग्नसराईचा हंगाम सुरु होताच नवरा-नवरीचे भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. नवरा-नवरी लग्नाचे फेरे घेताना स्टेजवर असलेले पाहुणे त्यांच्यासोबत मस्तीही करतात. याचदरम्यान मजा-मस्तीचे अनेक किस्से घडतात. पण लग्नात असे काही किस्से घडतात, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याच धक्का बसतो. असाच एक प्रकार व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आला आहे. नवरा-नवरीच्या करवल्यांनी स्टेजवर असं काही केलं, जे पाहून सर्वच पाहून लोटपोट हसू लागले.
लग्नमंडपात नेमकं काय घडलं?
व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, लग्न सुरू होतं,पण नवऱ्याला चुकून चार पत्नी मिळण्याची शक्यता होती.पण लग्न वेळेवर थांबवलं गेलं. त्यामुळे तो क्षण नक्कीच संस्मरणीय झाला. नंतर नवरीने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आणि सोशल मीडियावर एकच हशा पिकला. नवरी कनिष्का चौधरीने हा व्हिडिओ शेअर करत म्हटलंय की, "तो क्षण जेव्हा माझ्या नवऱ्याला तीन वेगवेगळ्या धर्मांच्या चार बायका मिळणार होत्या".
नक्की वाचा >> Viral Video: एका चुकीमुळे नवरा-नवरीचं लग्न थांबलं..Blinkit डिलिव्हरी बॉयने लाज राखली, 16 मिनिटांत जे घडलं..
या व्हिडिओमध्ये कनिष्का आणि तिचा नवरा नितीश मंडपात लग्नाचे फेरे घेताना दिसत आहेत.पण नवरीचा लेहंगा इतका जड होता की तिच्या तीन मैत्रिणींनी हाताने तो उचलला होता.फेऱ्या पूर्ण होईपर्यंत त्यांनी तो लेहंगा धरून ठेवला होता. पण योग्य वेळी सर्वांनी त्यांना थांबवलं. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी ट्रोलिंगही सुरु केली. पण कनिष्काने त्यांना प्रत्युत्तर दिलं.
नक्की वाचा >> चीनी फोनचा खेळ खल्लास! 'हा' स्मार्टफोन मार्केट करणार जाम, 10000mAh बॅटरी, 12 GB रॅम अन् बरंच काही..
हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून लोकांनी या व्हिडीओला खूप पसंती दर्शवली आहे. तसच नवरीची हसण्याची स्टाईलही लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. स्टेजवर घडलेला हा क्षण पाहून नवरी हसून हसून लोटपोट होताना दिसत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world