पिंपरी-चिंचवडमध्ये खासदारपुत्राची एन्ट्री! विश्वजित बारणे यांनी भरला उमेदवारी अर्ज, महायुतीत ताण कायम

पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जागावाटपावरून अद्याप एकमत झालेले नाही. भाजपने शिवसेनेला (शिंदे गट) 9 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सूरज कसबे, पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Election: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची मुदत 30 डिसेंबर 2025 जवळ येत आहे. अशातच खासदार श्रीरंग बारणे यांचे चिरंजीव विश्वजीत बारणे यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग क्रमांक 24 मधील 'मागास प्रवर्ग' (OBC) या जागेसाठी त्यांनी दोन अर्ज भरले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

महायुतीतील जागावाटपाचा पेच

पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जागावाटपावरून अद्याप एकमत झालेले नाही. भाजपने शिवसेनेला (शिंदे गट) 9 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे.

(नक्की वाचा- Pune Election 2026: घड्याळ- तुतारीवरुन वादंग! पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती फिस्कटली; सूत्रांची माहिती)

खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना 16 जागांवर ठाम आहेत. या ओढाताणीमुळे युतीची अधिकृत घोषणा लांबणीवर पडली आहे. जागावाटप निश्चित नसल्यामुळे कोणत्याही पक्षाने अधिकृत 'ए-बी' फॉर्म (उमेदवारी पत्र) दिलेले नाहीत.

महाविकास आघाडीतही अनिश्चितता

दुसरीकडे, महाविकास आघाडीत (ठाकरे गट, काँग्रेस, शरद पवार गट) अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येण्याचे संकेत मिळाल्याने काँग्रेस आणि ठाकरे गटात काहीशी चलबिचल आहे. या गोंधळामुळे ज्यांना आपली उमेदवारी निश्चित वाटत आहे, त्यांनी पक्षाच्या चिन्हाची वाट न पाहता स्वतःहून अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

Topics mentioned in this article