Pune News: दिवाळीच्या प्रमोशनसाठी 'ती' स्टाईल केली अन्... थेट पोलिसांनी बोलवले! रिल्स स्टारसोबत काय घडले?

Pimpri Chinchwad News: पिंपरी-चिंचवडमध्ये एका रिल्स स्टारला फटाक्यांच्या दुकानाचे 'हटके' परंतु 'गुन्हेगारी' प्रवृत्तीला प्रोत्साहन देणाऱ्या पद्धतीने प्रमोशन करणे चांगलेच महागात पडले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
PCMC News : हा व्हिडिओ व्हायरल होताच, वाकड पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेतली.
पिंपरी चिंचवड:

सूरज कसबे, प्रतिनिधी

Pimpri Chinchwad News: दिवाळीचा उत्साह सर्वत्र असताना, पिंपरी-चिंचवडमध्ये एका रिल्स स्टारला फटाक्यांच्या दुकानाचे 'हटके' परंतु 'गुन्हेगारी' प्रवृत्तीला प्रोत्साहन देणाऱ्या पद्धतीने प्रमोशन करणे चांगलेच महागात पडले आहे. वाकड पोलिसांनी (Wakad Police) या तरुणाला थेट पोलीस ठाण्यात बोलावून कडक शब्दांत समज दिली आहे, ज्यामुळे सोशल मीडियावरील 'लाइक्स'साठी कोणत्याही थराला जाणाऱ्या जाहिरातदारांना एक मोठा संदेश मिळाला आहे.

काय आहे प्रकरण?

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात फटाक्यांची दुकाने थाटली असून, व्यवसायासाठी सोशल मीडियावर जाहिरातबाजी सुरू आहे. वाकड परिसरातील एका तरुणाने आपल्या फटाक्यांच्या दुकानाचे प्रमोशन करण्यासाठी एक व्हिडिओ बनवला. मात्र, या व्हिडिओमध्ये त्याने चक्क गुन्हेगारी कृत्यांना प्रोत्साहन देणारी 'स्टाईल' वापरली.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. समाजात गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालणाऱ्या या व्हिडिओची दखल तात्काळ पिंपरी-चिंचवड पोलिसांनी घेतली.

( नक्की वाचा : Dombivli News: डोंबिवलीच्या रस्त्यावर थरार! कडेवर बाळाला घेऊन महिला फेरीवाल्याने अंगावर डिझेल ओतले; कारण... )
 

पोलिसांनी दिली कडक समज

हा व्हिडिओ व्हायरल होताच, वाकड पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेतली आणि तातडीने संबंधित रिल्स स्टारला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. पोलिसांनी या तरुणाला सांगितले की, समाजात गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारे व्हिडिओ बनवून त्याद्वारे व्यावसायिक जाहिरात करणे हे अत्यंत गंभीर कृत्य आहे. स्पर्धेच्या युगात प्रमोशन महत्त्वाचे असले तरी, ते सामाजिक भान राखून आणि कायद्याचे पालन करून करायला हवे, अशी कडक समज पोलिसांनी या तरुणाला दिली.

सध्याच्या काळात सोशल मीडियावर 'लाइक्स' आणि 'व्ह्यूज'साठी कोणत्याही थराला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र, अशा कृत्यांवर पोलिसांचे बारीक लक्ष असून, गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या व्हिडिओजमुळे कायद्याचा बडगा उगारला जाऊ शकतो, हे वाकड पोलिसांनी दाखवून दिले आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावरील जाहिरातदारांनी सामाजिक जबाबदारीचे भान राखणे किती महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित झाले आहे.

Advertisement
Topics mentioned in this article