जाहिरात

Piyush Goyal: पीयूष गोयल यांची तत्परता! भारतीय कामगाराचे पार्थिव मोझांबिकहून मायदेशी परतले

पियुष गोयल यांनी ज्या वेगाने सुत्र हलवली त्यामुळे उर्वरित प्रक्रियात्मक टप्प्यांमध्ये गती आली.

Piyush Goyal: पीयूष गोयल यांची तत्परता! भारतीय कामगाराचे पार्थिव मोझांबिकहून मायदेशी परतले
मुंबई:

केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी दिवंगत  मधुकर सुपुधू अहिरे यांचे पार्थिव मोझांबिक या देशातून भारतात आणण्यासाठी तत्परता दाखवली. त्यामुळे त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात आले. मधुकर अहिरे हे मुळचे उल्हासनगरचे रहिवाशी आहे. ते मोझांबिकमधील नामपुला येथे राहात होते.  13 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांचे तिथेच निधन झाले. त्यांचे पार्थिव आज गुरूवारी मुंबईत दाखल झाले.

मृत मधुकर अहिरे हे ACAI इंडस्ट्रियलमध्ये कार्यरत होते. त्यांच्याकडे वैध भारतीय पासपोर्ट आणि मोझांबिकन वर्क व्हिसा होता. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर शोकग्रस्त कुटुंबीयांनी या प्रकरणात त्यांना येत असलेल्या अडचणी पीयूष गोयल यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तसे लेखी विनंतीद्वारे त्यांनी गोयल यांना दिले होते. शिवाय मधुकर यांचे पार्थिव भारतात परत आणण्यासाठी मदतीची मागणी केली होती. याची गोयल यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी आपल्या कार्यालयाला परराष्ट्र मंत्रालय (MEA) आणि मापुटो येथील भारतीय उच्चायुक्तालयाशी समन्वय साधण्याचे निर्देश दिले. 

नक्की वाचा - नवी मुंबई विमानतळावरून पहिलं विमान कुठल्या शहरात जाणार? उतरणारं विमान कोणतं? तिकीटाचे दर काय?

पियुष गोयल यांनी ज्या वेगाने सुत्र हलवली त्यामुळे उर्वरित प्रक्रियात्मक टप्प्यांमध्ये गती आली. शिवाय मधुकर अहिरे यांच्या कुटुंबीयांनाही जलद गतीने मदत झाली. भारतीय उच्चायुक्तालयाने मापुटो यांनी पार्थिव भारतात आणण्यासाठी आवश्यक व्यवस्था केली. सर्व दूतावास कागदपत्रे पूर्ण केली. या नंतर, 18 नोव्हेंबरला विमानतळ आरोग्य संघटनेची (APHO) परवानगी मिळाली. मोझांबिकहून केनियाई एअरलाइन्सद्वारे पार्थिव आणले गेले. ते आज मुंबईत पोहोचले.

नक्की वाचा - Nagpur News: बिबट्यावर चिमुकल्याने थेट चप्पल फेकून मारली, त्यानंतर पुढील 4 तास अंगावर काटा आणणारा थरार

MEA, मोझांबिकमधील भारतीय मिशन आणि पियुष गोयल यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे, प्रत्यावर्तन प्रक्रिया त्वरित पूर्ण झाली. ज्यामुळे कुटुंबाला अंतिम संस्कार सन्मानाने करता येणे शक्य झाले आहे. भारतातील कुटुंबांना दुःखाच्या क्षणी साथ देणे ही माझी जबाबदारी होती असं यावेळी पियुष गोयल म्हणाले. खासकरून जेव्हा अशा प्रकारच्या दुर्घटना परदेशात घडतात तेव्हा ही जबाबदारी अधिकच वाढते. अधिकाऱ्यांनी MEA आणि भारतीय मिशन यांच्याशी समन्वय साधला, आणि प्रक्रियेला वेग आला. यामुळे पार्थिव भारतामध्ये परत येणे सोपे झाले असं ही ते म्हणाले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com