जाहिरात

Asha Bhosle : आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका; ब्रीच कँडी रुग्णालयात हलवलं, ICU मध्ये दाखल!

आशा भोसले यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Asha Bhosle : आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका; ब्रीच कँडी रुग्णालयात हलवलं, ICU मध्ये दाखल!

asha bhosle heart attack : ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले (वय ९२ वर्षे) यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे. आशा भोसले याच्या प्रकृतीबद्दल रुग्णालयातून अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. 

आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका...

आशा भोसले या ९२ वर्षांच्या आहेत. आशा भोसले सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात. आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ साली झाला. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका मराठी नाटकाला हजेरी लावली होती. त्याशिवाय अनेक संगीतांच्या कार्यक्रमातही त्या उपस्थित राहतात. अशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com