Asha Bhosle Granddaughter Video: भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिका आशा भोसले यांचे रविवार (12 एप्रिल) निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (13 एप्रिल) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर आज त्यांची नात जनाई भोसले हिने इन्स्टाग्रामवर आपल्या आजीसोबतच्या सुंदर आठवणींना उजाळा देत एक भावुक व्हिडीओ शेअर केला आहे. या पोस्टमध्ये जनाईने म्हटलंय की, तिची आजी तिच्यासाठी केवळ कुटुंबातील एक सदस्य नव्हती, तर तिचे संपूर्ण जग होती. जनाईने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "आज सकाळी जेव्हा मी उठले, तेव्हा मला जाणीव झाली की माझी क्राइम पार्टनर, माझी जिवलग मैत्रीण आणि ज्या व्यक्तीने माझे जग पूर्ण केले होते, तिला मी गमावले आहे. जिने माझ्या जन्मानंतर मला सर्वात आधी आपल्या कुशीत घेतले होते, ती आता आपल्यात नाही."
माझे संपूर्ण जगच हिरावले गेले आहे: जनाई भोसले
तिने पुढे लिहिलंय, "आता मी काय करू? आता सकाळी उठल्यावर मी कोणाला मिठी मारू आणि कोणासोबत चहा पिऊ? माझी वाट कोण बघणार? आणि मी कोणाशी थट्टा-मस्करी करणार? माझे संपूर्ण जगच हिरावले गेले आहे." आजीच्या आठवणीत जनाई म्हणाली, "या तर केवळ काही गोष्टी आहेत ज्या मला त्यांची आठवण करून देतात. पण जे लोक माझ्यासोबत हे दुःख अनुभवत आहेत, त्यांना मला इतकेच सांगायचे आहे की, जर कोणी त्यांची आठवण काढत असेल, तर आनंद आणि उत्साहात त्यांची आठवण काढावी ज्यासाठी त्या नेहमी ओळखल्या जात होत्या. त्यांनी प्रत्येकाच्या आयुष्यात हसू आणि आनंद भरण्याचे काम केले."
(नक्की वाचा: Asha Bhosle News: 'चल तात्या, तुला पण साडी देते!' आशाताईंनी डॉ. तात्याराव लहानेंना असं का म्हटलं? वाचा हृदयस्पर्शी पोस्ट)
पाहा व्हिडीओ
ती लवकरच माझ्याकडे पुन्हा येईल: जनाई भोसले
तिने पुढे लिहिले, "मला वाटते की ती वरून आपल्या सर्वांकडे, विशेषतः आपल्या कुटुंबाकडे लक्ष ठेवून आहे. मला खात्री आहे की ती लवकरच माझ्याकडे पुन्हा येईल, कारण तिनं मला तसे वचन दिले होते आणि ती नेहमीच असे म्हणायची. मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे प्रेम गमावले आहे आणि यापेक्षा मोठे दुःख जगात दुसरे कोणतेही नाही. म्हणून मला तुम्हा सर्वांना सांगायचे आहे की, आयुष्य पूर्णपणे जगून घ्या आणि तिला याच रुपात स्मरणात ठेवा". पोस्टच्या शेवटी जनाईने लिहिले, "आय लव्ह यू आशाई... अलविदा... मला माहिती आहे की काहीही झाले तरी तू नेहमी माझ्यासोबत असणार. मी फक्त तू पुन्हा येण्याची आणि मला पुन्हा एकदा मिठीत घेण्याची वाट पाहत आहे."
(नक्की वाचा: Asha Bhosale Granddaughter: आशा भोसलेंची नात आहे बॉलिवूडची सुपरस्टार, 16व्या वर्षीच सलमान खानच्या सिनेमाची ऑफर)
(Content Source IANS)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world