PM Narendra Modi Speech : WAVES 2025 या बहुप्रतीक्षित महोत्सवाचा शुभारंभ आज, 1 मे 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह बॉलिवूड आणि क्रिएटिव्ह क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. व्हेव्ज हा केवळ शब्द नाही तर ही एक लाट आहे, अशा शब्दात या कार्यक्रमाचं वर्णन केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटनप्रसंगीच्या भाषणा म्हटलं की, मुबंईत आज 100 हून अधिक देशातील गुंतवणूकदार, क्रिएटर्स, आर्टिस्ट एकत्र आले आहेत. एकप्रकारे आज इथे ग्लोबल टॅलेन्ट, ग्लोबल क्रिएटिव्हिटचा पाया रचला जात आहे. वेव्ह्ज हा केवळ शब्द नाही ही एक लाट आहे. कल्चर, क्रिएटीव्ही , युनिव्हर्सल कनेक्टिव्हिटी, फिल्म, म्युझिक, गेमिंग, अ्रनिमेशन, स्टोरी टेलिंग अशा विविध गुणवंतांचा अथांग संसार आहे.
वेव्ह्ज असं व्यासपीठ आहे, जे प्रत्येक कलाकारासाठी आहे. इथे युवक नव्या आयडियांसोबत क्रिएटिव्ह जगासोबत जोडला जाईल. यासाठी मी सर्वांचं अभिनंदन करतो. आजपासून 112 वर्षांपूर्वी 3 मे 1913 रोजी पहिली फिचर फिल्म 'राजा हरिश्चचंद्र' प्रदर्शित झाली होती. याची निर्मिती दादासाहेब फाळकेंनी केली होती. गेल्या 100 वर्षात भारतीय सिनेमाने भारताला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यात यश मिळवलं आहे. रशियात राज कपूर, कान्समध्ये सत्यजित रे प्रसिद्ध आहेत. वेव्ह्जच्या मंचावर भारतीय सिनेमातील अनेक दिग्गजांना पोस्टाच्या तिकीटाच्या माध्यामातून स्मरण केलं जात आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
'वैष्णव जन तो' गाण्याचे जग एकत्र आलं- PM मोदी
महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीवेळी 150 देशातील गायक-गायिकांना गांधींजींचं प्रिय गीत 'वैष्णव जन तो' गाण्यासाठी प्रेरित केलं होतं. हे गीत 500-600 वर्ष जुनं आहे. मात्र त्यावेळी जगभरातील कलाकारांनी हे गीत गायलं. याचा मोठा परिणाम म्हणजे जग एकत्र आलं, याची आठवणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे आवर्जून करुन दिली.
वेव्ह्जने जगाचं लक्ष वेधलं- PM मोदी
भारत आणि जगातील क्रिएटीव्हिटीची ताकद आपण पाहिली आहे. आज तीच कल्पना प्रत्यक्षात जमिनीवर उतरली आहे. जसं सूर्य उगवताच आकाशाला रंग मिळतो. तसंच वेव्ह्ज समिट आतापासूनच चमकायला लागली आहे. पहिल्या दिवसापासूनच वेव्ह्जने जगाचं लक्ष वेधलं आहे. सर्वांनी जी मेहनत घेतली ती इथे दिसत आहेत, असा उल्लेखही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.