Pune News: पुण्यात किती उमेदवारांची डिपॉझिट झाले जप्त? डिपॉझिट जप्त होणारे सर्वाधिक उमेदवार कोणत्या पक्षाचे?

या निवडणुकीत आरक्षित जागांसाठी 2,500 रुपये, तर सर्वसाधारण जागांसाठी 5,000 रुपये अनामत रक्कम निश्चित करण्यात आली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • पुणे महापालिका निवडणुकीत 165 जागांसाठी एकूण 1,155 उमेदवार रिंगणात होते,
  • शिवसेना शिंदे गटाच्या 104 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली असून त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे
  • पुणे महापालिकेत एकूण 796 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पुणे:

पुणे महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये उमेदवारांच्या अनामत रकमेबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. पुणे महापालिकेच्या 165 जागांसाठी एकूण 1,155 उमेदवार रिंगणात होते. मात्र, यातील 796 उमेदवारांना आपली अनामत रक्कम (Deposit) वाचवण्यात अपयश आले आहे. नियमानुसार, एकूण मतदानाच्या ठराविक मते न मिळाल्यास उमेदवाराची अनामत रक्कम जप्त केली जाते. अनामत रक्कम जप्त झालेल्या उमेदवारांची संख्या या निवडणुकीत मोठी आहे. त्यात मुख्य राजकीय पक्षांच्या उमेदवारांचाही समावेश आहे.

नक्की वाचा - Pune News: निवडून येताच भाजपच्या नगरसेवकांचा राडा, नगरसेविकेच्या भावावर हल्ला! प्रकरणाला वेगळचं वळण

या निवडणुकीत राजकीय पक्षांमध्ये सर्वात मोठा फटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'शिंदे-सेनेला' बसला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या तब्बल 104 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. त्यापाठोपाठ आम आदमी पक्षाचे (AAP) 81 उमेदवार आपले डिपॉझिट वाचवू शकले नाहीत. सत्ताधारी भाजपसाठी मात्र दिलासादायक बाब म्हणजे, त्यांच्या केवळ 4 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रत्येकी 58 उमेदवारांनी डिपॉझिट गमावले आहे.

नक्की वाचा - Mumbai BMC Mayor Election: महापौर कोण आणि कोणाचा ? आज कळणार

अपक्षांची मोठी संख्या
राजकीय पक्षांसोबतच अपक्ष उमेदवारांनाही पुणेकरांनी नाकारल्याचे दिसून येते. एकूण 271 अपक्ष उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. या निवडणुकीत आरक्षित जागांसाठी 2,500 रुपये, तर सर्वसाधारण जागांसाठी 5,000 रुपये अनामत रक्कम निश्चित करण्यात आली होती.

अनामत गमावलेल्या उमेदवारांची संख्या

  • शिवसेना (शिंदे)  104
  • आप 81
  • काँग्रेस 58
  • वंचित 58
  • शिवसेना (ठाकरे) 53
  • मनसे 38
  • बसपा 35
  • राष्ट्रवादी काँग्रेस 23
  • राष्ट्रवादी (शरद पवार पक्ष) 20