- मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात महत्त्वाची बैठक.
- अडीच वर्षे मुंबईचे महापौरपद मिळावे अशी शिवसेनेची मागणी
- इतर महापालिकांच्या महापौरपदाबाबतही आज निर्णय होण्याची शक्यता
मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महत्त्वाच्या महापालिकांमधील सत्तावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी रविवारी दुपारी एक महत्त्वाची बैठक होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात होणाऱ्या या बैठकीकडे राज्यातील सगळ्या राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला असून, आजच्या बैठकीत मुंबईच्या महापौरपदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेना आग्रही
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने, मुंबईत किमान अडीच वर्षे शिवसेनेचा (शिंदे गट) महापौर असावा, अशी आग्रही मागणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून केली जात आहे. मुंबई महापालिकेत भाजपचे 89 नगरसेवक निवडून आले आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेनेच्या जागा कमी असल्या तरी त्यांच्याशिवाय सद्यस्थितीत भाजपला पर्याय नाहीये. बहुमतासाठीचा 114 हा आकडा गाठण्यासाठी शिंदे गटाची मदत भाजपला अनिवार्य आहे. त्यामुळे भाजपने मुख्यमंत्रीपद सोडले, तसे आता मोठे मन दाखवून महापौरपदही द्यावे, असं शिंदे गटाचे म्हणणे आहे.
नक्की वाचा: महायुतीत कलह! मुंबईत शिवसेनेने केला भाजपचा गेम? 11 प्रभागांमध्ये छुपी खेळी केल्याचा आरोप
इतर महापालिकांबद्दलही आज होऊ शकतो निर्णय
केवळ मुंबईच नव्हे, तर ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबई या महापालिकांमधील सत्तावाटपाचा निर्णयही याच बैठकीत एकत्रितपणे घेतला जाण्याची शक्यता आहे. मीरा-भाईंदरमध्ये प्रताप सरनाईक यांनी काही नवी समीकरणं जुळवली आहेत, तर कल्याण-डोंबिवलीत श्रीकांत शिंदे यांच्यामुळे मनसेने शिंदे सेनेला पाठिंबा दर्शवला आहे. मुंबईत जे सूत्र ठरेल, त्याच धर्तीवर इतर शहरांमध्येही सत्तेचा वाटा दिला जाईल असे सांगितले जात आहे.
नक्की वाचा: छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोवर चिकटवल्या जाहिराती, शिवप्रेमींमध्ये संताप
महापौर निवडीसाठी फेब्रुवारी महिना उजाडणार?
येत्या मंगळवारी किंवा बुधवारी महापालिकेतील गटनोंदणी होण्याची शक्यता आहे. विभागीय आयुक्तांकडे ही नोंदणी झाल्यावर महापौरपदाच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा होईल. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ही निवडणूक पार पडू शकते, अशी माहिती भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिली आहे. मुंबईत भाजपचे अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यातही यासंदर्भात प्राथमिक चर्चा पूर्ण झाली आहे असे सांगण्यात येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world