जाहिरात

Pune News: पुण्यात PMRDA ने रचला इतिहास! 'या' सेक्टरमध्ये फक्त 95 दिवसांत बांधली 14 मजली इमारत

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) बांधकाम क्षेत्रात एक नवा मैलाचा दगड प्रस्थापित केला आहे.पिंपरी चिंचवड येथील सेक्टर 12 मधील गृहप्रकल्पात केवळ 95 दिवसांत 14 मजली इमारत यशस्वीरित्या उभारण्यात आली आहे.

Pune News: पुण्यात PMRDA ने रचला इतिहास! 'या' सेक्टरमध्ये फक्त 95 दिवसांत बांधली 14 मजली इमारत
Pune PMRDA 14th Floor Building
पुणे:

सूरज कसबे, प्रतिनिधी

PMRDA Latest News:  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) बांधकाम क्षेत्रात एक नवा मैलाचा दगड प्रस्थापित केला आहे.पिंपरी चिंचवड येथील सेक्टर 12 मधील गृहप्रकल्पात केवळ 95 दिवसांत 14 मजली इमारत यशस्वीरित्या उभारण्यात आली आहे.या विक्रमी कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये घेण्यात आली असून,अशा प्रकारची देशातील ही पहिलीच घटना ठरली आहे.

या प्रकल्पासाठी अत्याधुनिक आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या थ्री एस प्रि-फॅब  तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.बी.जी.शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीचे उपाध्यक्ष योगेश काजळे यांनी म्हटलंय की,चिखली येथील या प्रकल्पात जवळपास 6 हजार घरांसाठी 40 हून अधिक इमारतींचे बांधकाम याच प्रगत पद्धतीने करण्यात येत आहे.

नक्की वाचा >>Pune News: पुण्यात सराईत टोळीचा थरार, Amazon कंपनीच्या गेटसमोर घडला सर्वात भयंकर प्रकार, पोलिसही हादरले

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद

वेगवान कामासोबतच गुणवत्तेवरही विशेष भर देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. पीएमआरडीएच्या अधिकारी रिनाज पठाण यांनी माहिती दिली की,इतक्या कमी कालावधीत भव्य इमारत उभी राहणे ही अभिमानास्पद बाब असून,या विक्रमाची अधिकृत नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. 

नक्की वाचा >> Success Story : अकोल्यातील पोरं लय हुश्शार! 'या' 7 जणांनी MPSC परीक्षेत मिळवलं घवघवीत यश, वाचा सक्सेस स्टोरी

यामुळे सरकारी गृहप्रकल्पांच्या कामाला आता नवीन गती मिळण्याची चिन्हे आहेत.अतिवेगाने बांधकाम पूर्ण झालेल्या या इमारती पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा पीएमआरडीए प्रशासनाकडून करण्यात आला आहे.मात्र,या दाव्यावर विश्वास ठेवून सर्वसामान्य नागरिक आणि घरखरेदीदार या प्रकल्पाला कसा प्रतिसाद देतात,याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com