Nashik News : नाशिक हिंसाचार प्रकरणी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, MIM च्या शहराध्यक्षासह 38 जणांना अटक

Nashik Violence : गुन्हा दाखल होताच काँग्रेस पदाधिकारी हनीफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख आणि शरद पवार गटाशी संबंधित आरिफ हाजी नॉट रिचेबल झाले आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

प्राजल कुलकर्णी, नाशिक

Nashik News : नाशिकच्या पखाल रोड हिंसाचार प्रकरणी नाशिक पोलीस अॅक्शन मोडवर आहेत. पोलिसांनी आता आरोपींची धरपकड सुरू केली असून आतापर्यंत 38 जणांना अटक करण्यात आली आहे. हिंसाचार प्रकरणी पॉलिटिकल कनेक्शन उघड झाल्याने देखील चर्चेचा विषय आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पोलिसांनी हिंसाचार प्रकरणी एमआयएम शहराध्यक्ष मुख्तार शेखला बेड्या ठोकल्या आहेत. तर गुन्हा दाखल होताच काँग्रेस पदाधिकारी हनीफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख आणि शरद पवार गटाशी संबंधित आरिफ हाजी नॉट रिचेबल झाले आहेत. 

नाशिकच्या पखाल रोडवरील दगडफेक आणि हिंसाचार प्रकरणी तब्बल 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींमध्ये काँग्रेसचे हनिफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अरीफ हाजी पटेल शेखचा यांचाही समावेश आहे. कट रचणे, अफवा पसरवणे, प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष हिंसाचार घडविण्यात सहभाग असल्याने गुन्हा दाखल झाला आहे.

नक्की वाचा - Saleel Kulkarni Video : 'नवीन डेटा पॅक दे रे'; सोशल मीडियाचं भयाण वास्तव, प्रत्येकाने ऐकावी अशी कविता

दर्गा अतिक्रमण कारवाई दरम्यान नाशिक पोलिसांवर जमावाने केला होता. या हल्ल्यात 21 पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी तर 25 ते 30 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. घातक शस्त्रे, लाठ्या-काठ्या, दगड, विटा आणि फरशांनी पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता. मोबाइल व्हिडीओ, परिसरातील सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article